शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भजनात दंग, भक्तांना जेवण वाढलं आणि…; कोकणहार्टेड गर्ल पंढरपूरच्या यादीत नवऱ्यासह सहभागी, मनोभावे भक्ती अन् सेवा करताना…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Walawalkar Vaari Special

भजनात दंग, भक्तांना जेवण वाढलं आणि…; कोकणहार्टेड गर्ल पंढरपूरच्या यादीत नवऱ्यासह सहभागी, मनोभावे भक्ती अन् सेवा करताना…

Ankita Walawalkar Vaari Special : आषाढ सुरु होताच ओढ लागते ती वारीची. वर्षभर ही भक्तमंडळी या वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही भक्तमंडळी अगदी पायी पायी पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. पंढरपूरला जात पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ही भावना मनोमनी बाळगून हे भक्त हातात टाळ, मृदूंग घेऊन वाटेने जातात. काहीजण विठूनामाचा भजनात कीर्तन करत पंढरपूरची यात्रा करतात. वारीचा हा सोहळा अनेकजण नेत्रसुख घेत अनुभवतात. यंदाच्या या वारीत अनेक कलाकार मंडळी सहभागी झालेले पाहायला मिळाले. आणि या कलाकार मंडळींनी तर या वारीला चारचाँद लावले.

यंदाच्या या वारीमध्ये कलाकार मंडळी वारकऱ्यांच्या सेवेत रुजू झालेले दिसले. अनेक कलाकारांनी स्वतःच्या हाताने अगदी मनोभावे त्यांची सेवा केली. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरही या विठुरायाच्या वारीत तल्लीन झालेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने या वारीतील आनंद शेअर केला आहे. या वारीत अंकिता एकटीच नाहीतर तिच्या पतीसह म्हणजेच कुणालबरोबर सहभागी झाली.

आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशाली करतोय शूट, १०२ ताप अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती

अंकिताने या वारीदरम्यान भक्तांची सेवाही केली. स्वतःच्या हाताने तिने भक्तांच्या पंक्तीत जेवण वाढले, यावेळी अनेक तिच्या चाहते भक्तही तिला प्रेम देताना दिसले. शिवाय अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासह अंकिता व कुणाल भजनात दंग झालेलेही दिसले. या वारीसोहळ्यातील अंकिताच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अंकिताने यावेळी कॉटनची साडी नेसली होती, आणि तिच्या ब्लाउजवरील विठू नामाच्या डिझाईनने साऱ्यांचं लक्ष वेधलं.

आणखी वाचा – “कोणाचं घर तोडायला प्रेम केलं नाही”, अरुणा इराणी यांचं लग्नाबाबत भाष्य, म्हणाल्या, “तुमचा नवरा…”

‘बिग बॉस मराठी’मुळे अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अंकिता सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे मालवणी आणि कोकणी भाषेतील व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडतात. शिवाय सिंधुद्योग नावाने तिचा स्वतःचा मालवणी खाद्यपदार्थांचा ब्रँडही आहे. अंकिता तिच्या लग्नामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अंकिताच्या शाही विवाहसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Tags: ankita walawalkarpandharpur vaariVaari Special
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Jui gadkari viral video

Video : रस्त्यांवर पाणीच पाणी, रिक्षामधून शूटसाठी पोहोचली जुई गडकरी, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.