Kajol Shares Photo With Daughter : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा देवगण नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघीही बऱ्याच सक्रिय असून अनेकदा त्या पार्टी, इव्हेन्टमध्ये स्पॉट होताना दिसतात. काजोलपेक्षा तिची लेक न्यासा ही तिच्या मित्रपरिवारामुळे अधिक चर्चेत असते. आता काजोलने तिची २१ वर्षांची मुलगी न्यासाबरोबरचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे छायाचित्र पाहून काजोलच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. काजोल आपल्या मुलीपेक्षाही लहान दिसतेय याचे साऱ्यांना आश्चर्य वाटतेय. त्यामुळे अभिनेत्रीचा लेकीबरोबरचा हा फोटो चर्चेत आला आहे.
काजोलने आपल्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दोन मटार एका पॉडमध्ये, आणि एका बॉक्समध्ये दोन चॉपस्टिक्स”. काजोल व न्यासा यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले आहे की, “काजोल तिची मुलगी न्यासापेक्षा लहान दिसते”. तर आणखी एका युजरने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “काजोल जी तिच्या मुलीपेक्षा लहान दिसतेय”.
या पोस्ट एका चाहत्याने असंही म्हटलं आहे की, “काजोल खरोखरच २० वर्षांची दिसतेय. तुम्ही हे कसे करत आहात?”, असा सवालही गमतीत विचारला आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “एक मोठी बहिण आणि एक धाकटी बहीण दिसतेय”. काजोलचे वय सध्या ५० वर्षे आहे. तिने २४ फेब्रुवारी १९९९ रोजी अजय देवगणबरोबर लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. न्यासा आणि युग अशी त्यांची नावे आहेत.
न्यासा सध्या २१ वर्षांची आहे. न्यासा हिने मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती सिंगापूरला गेली होती. याशिवाय तिने स्वित्झर्लंडमधील महाविद्यालयातही शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीच्याकामाबद्दल बोलायचे झाले तर काजोल ‘सरजमीन’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती महाराग्नी- क्वीन ऑफ क्वीन्समध्येही दिसणार आहे. तिच्याकडे ‘मा’ हा चित्रपटही आहे. काजोल गेल्या वर्षी ‘दो पत्ती’ चित्रपटात दिसली होती.