प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या युष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे. गेल्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर ती बरी होण्यासाठी अनेक वेदनादायक प्रक्रियांमधून जात आहे. एवढा गंभीर आजार वाटेला येऊनही तिने हार मानली नाही. ती या गंभीर आजाराला धैर्याने तोंड देत आहे. ती उपचार घेत असतानाकज अनेक ठिकाणी फिरत आहे. तसंच शूटिंगही पार पाडत आहे. याबद्दलचे वेगवेगळे अपडेट ती आपल्या चाहत्यांना देत असते. मात्र हे सगळं ती सहानुभूतीसाठी करत असून तिच्या पीआर टीमच्या म्हणण्यानुसार ती हे करत असल्याचे आरोप एका अभिनेत्रीने तिच्यावर केले आहेत. (rozlyn khan on hina khan cancer)
अभिनेत्री आहे रोझलिन खानने हिना खानवर हे आरोप केले आहेत. रोझलिन खान, जी स्वतः कर्करोगातून बरी झाली आहे. तिने हिना खानवर तिच्या स्वतःच्या ठिक होण्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. याबद्दल तिने आपल्या सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत रोजलीन खानने म्हटलं आहे की, “स्त्रीला सर्वात मोठा आघात म्हणजे केमोथेरपीमुळे टक्कल पडणे. आपण ते सामान्य कसे करू शकता. प्राणीसंग्रहालयातील सिंहीण इतके धैर्य दाखवू शकते का? ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केला आहे?

आणखी वाचा – “मला तुझ्याशी लग्न करायचंय”, अमृता खानविलकरकडे चाहत्याची अजब मागणी, म्हणाली, “ऑफरबद्दल धन्यवाद पण…”
यापुढे तिने या स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की, “गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे. कारण हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी कॅन्सरचा वापर करणाऱ्या काही जणांना आणि तुला ही गोष्ट माहीत आहे की वैद्यकीय गैरसमज पसरवण्यासाठी भारतात काहीही शिक्षा नाही. सोनाली बेंद्रे, लिसा, मनिषा कोईराला यांसारख्या काही सजग अभिनेत्रींनी कधीच इतकी खालची पातळी गाठून लोकांची दिशाभूल केली नव्हती”.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, पार पडला साखरपुडा सोहळा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
तर आणखी एक स्टोरी पोस्ट करत तिने हे आरोप केलेत की, “कॅन्सरबद्दल चुकीची माहिती पसरवताना सेलिब्रिटींना लाज वाटली पाहिजे, मित्रांनो कृपया अशा लोकांना फॉलो करू नका जे ०५ डिसेंबर रोजी शस्त्रक्रियेचे फोटो पोस्ट करतात आणि २१ डिसेंबरला प्रवास करतात. मला सांगायला खेद वाटतो की, हे मानवी दृष्ट्या अशक्य आहे. ही अभिनेत्री कॅन्सर सारख्या घातक रोगाचा वापर करून स्वत:च्या बातम्या बनवत आहे. ती तुम्हाला प्रेरणा देत नाही, ती तिच्या पीआर प्लॅननुसार पोस्ट करत आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला वाचवा आणि तुमच्या ऑन्कोलॉजिस्टच्या सल्ल्याचे अनुसरण करा”. दरम्यान, यावर अद्याप हिना खानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नसून तिच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहत आहेत