शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी सोनार व अंबर गणपुळेचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूक व हिरव्या साडीमध्ये नटली नवरी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 21, 2025 | 12:08 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding 

शिवानी सोनार व अंबर गणपुळेचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूक व हिरव्या साडीमध्ये नटली नवरी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding  : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे अभिनेता अंबर गणपुळे व अभिनेत्री शिवानी सोनार. अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. आज दिनांक २१ जानेवारी रोजी शिवानी व अंबर यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. अखेर शिवानी व अंबर यांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. बरेच दिवसांपासून शिवानी व अंबर यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत होती. अखेर आता दोघेही विवाहबंधनात अडकले असल्याचं समोर आलं आहे. शिवानी व अंबर यांनी अगदी थाटामाटात त्यांचं लग्न केलं असल्याचं फोटोंवरुन समोर आलं आहे. या जोडीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत अनेक चाहते होते.

शिवानी व अंबर यांनी पारंपरिक अंदाजात विवाहसोहळा उरकला आहे. अगदी थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी शिवानी व अंबर यांचा मराठमोळा व पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे. यावेळी शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे आणि त्यावर घातलेले भरजरी दागिने या लूकची शोभा वाढवत आहेत. तर अंबरने फिकट गुलाबी रंगाचा सदरा आणि त्यावर फिकट हिरव्या रंगाचं धोतर परिधान केलं आहे. दोघेही या नववधूवराच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

आणखी वाचा – “तो जवळजवळ मरत आहे”, गुरुचरण सिंहच्या जवळच्या मैत्रिणीकडून ३३ लाख रुपयांची मदत, अभिनेत्याच्या तब्येतीबाबत मोठा खुलासा

View this post on Instagram

A post shared by Jagannath Patil (@jpatil719)

तर शिवानी व अंबरजवळील गुलाबी रंगाच्या शेल्याने दोघांच्या लूकमध्ये भर घातली आहे. लग्नापूर्वी त्यांच्या संगीत सोहळ्याचे तसेच हळदी समारंभाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. तसेच त्यांच्या केळवणाचे फोटोही विशेष चर्चेत राहिले. विशेषतः रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने शिवानी व अंबर यांचं खास केळवण केलं. त्याचे फोटो, व्हिडीओही बरेच व्हायरल झाले.

आणखी वाचा – “कॅन्सरचा वापर करुन प्रसिद्धी मिळवते”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा हिना खानवर गंभीर आरोप, म्हणाली, “लाज वाटली पाहिजे…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

शिवानी व अंबर हे दोघंही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आजवर दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे शिवानीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तर अंबर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकला होता.

Tags: marathi celebrity weddingShivani Sonar & Ambar GanpuleShivani Sonar & Ambar Ganpule Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

सैफ अली खानवर हल्ला करणारा तो नाहीच; सीसीटीव्हीमध्ये दिसला होता वेगळाच मुलगा, नक्की आरोपी कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.