शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिला घटस्फोट, पुन्हा लग्न, डिप्रेशन, तीन मुलं अन्…; आता फक्त रिल्सवरच दिसते ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, वैवाहिक आयुष्यामध्ये फसली तेव्हा…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 5, 2024 | 7:51 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
actress tanaaz irani

पहिला घटस्फोट, पुन्हा लग्न, डिप्रेशन, तीन मुलं अन्...; आता फक्त रिल्सवरच दिसते 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री, वैवाहिक आयुष्यामध्ये फसली तेव्हा...

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत अनेक काळकरांनी मजल मारली आहे. लहान पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आपले अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये तनाज इराणी. लहान पडद्यावर चांगले नाव कमावल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच तिने हृतिक रोशन, अभिषेक बच्चन अशा बड्या कलाकारांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण काही कारणांमुळे तिची परिस्थिति बदलली आणि ती चित्रपटसृष्टीपासून दूर झालेली पाहायला मिळाली. तनाजबरोबर नक्की काय घडलं हे जाणून घेऊया. (actress tanaaz irani)

तनाजने टेलिव्हिजनवरील ‘जुबान सांभाल के’ या शोमधून अभिनय करण्यास सुरुवात केली. या शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला इतर मालिकांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. मालिकांमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिचे नशीब बदलले आणि मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली.

आणखी वाचा – Video : मृत्यूनेही टेकले हात; भूंकपामुळे हॉस्पिटल हालत असताना नर्सने स्वतःच्या जीवाशी खेळत बालकांना वाचवलं, भयावह व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Tannaz Irani (@tannazirani_)

एका पार्टीमध्ये गेली असताना तिची भेट राकेश रोशन यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी तिला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटासाठी ऑफर दिली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर तिने ‘मै प्रेम की दिवानी हू’ व ’36 चायना टाऊन’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. पण नंतर तिच्याबरोबर एक भयंकर घटना घडली ज्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. याबद्दलचा खुलासा तिने स्वतः एका मुलाखतीदरम्यान केला.

आणखी वाचा – स्कर्ट, टॉप अन्…; साडी, नथ नव्हे तर प्रथमेश लघाटेने बायकोचे वेस्टर्न लूकमधील फोटो केले शेअर, मुग्धाच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा

तनाजने सांगितले की, “अधिक काळ ऊंच हिल्स घालून काम केल्याने मला L4 व L5 स्लिप डिस्कची समस्या झाली. कालांतराने माझे हे दुखणे खूप वाढले आणि मला चालण्यामध्ये समस्या येऊ लागल्या. कामापासून दूर झाल्याने मी माझा सगळा आत्मविश्वास गमावला आणि मला नैराश्य आले. पण हळू हळू मी त्यातून बरी होऊ लागले”. पुढे ती म्हणाली की, “त्यानंतर मी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे माझ्या पाठीचं दुखणं कमी झालं पण माझ्या पायमध्ये समस्या आली”.

तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी फरीद करीमबरोबर लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी तिची भेट बख्तियार इराणीबरोबर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न केले. ती आता 3 मुलांची आई असून तिच्या खासगी आयुष्यात खूप खुश आहे. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.    

Tags: bollywood actresskaho na pyar haitannaz iranitelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Serial Set Visit

Video : स्विमिंग पूल, निसर्गरम्य वातावरण, अवाढव्य बंगला अन्…; साताऱ्यात असा आहे 'पारू' मालिकेचा सेट, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.