एखादा कलाकार अभिनय करताना त्याची संपूर्ण एनर्जी लावून काम करत असतो. दिवस रात्र, ऊन वारा पाऊस काहीही न पाहता केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ही कलाकार मंडळी काम करत असतात. पडद्यावर आपलं काम उत्तम दिसावं आणि प्रेक्षकांना आवडावं या एका भावनेपोटी ही कलाकार मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. शिवाय चाहत्यांचं मिळणार भरभरून प्रेम पाहता त्यांच्यासाठी कलाकार ही आपला वेळ देत असतात. विशेषतः मालिकेतील कलाकारांचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. अशातच सध्या टीआरपीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका.(Jui Gadkari Bts Video)
ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसतंय. दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे, आणि दोन्ही कलाकार सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच मालिकेतील सायलीने एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सीन शूट करताना सायलीची उडालेली गडबड पाहायला मिळतेय.
पाहा जुईने काय घातला घोटाळा (Jui Gadkari Bts Video)
ठरलं तर मग मालिकेतील सीन शूट करत असताना सायलीने एक तिचा bts व्हिडीओ शेअर केला आहे. यांत सायलीचा उडालेला गोंधळ पाहायला मिळतोय. सायली या व्हिडिओमध्ये सीन शूट करताना गोंधळली दिसत्ये आणि चुकून तिच्या हातून चहाचा कपातून चहा सांडलेली दिसतेय. हे सायलीकडून चुकून झालेलं आहे, त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघांनाही हसू आवरलेलं नाहीय. (Jui Gadkari Bts Video)
हे देखील वाचा – मल्हार आणि मंजुळा येणार आमने सामने
सीन शूट करत असतानाच चहा सांडलेला दिसताच स्पॉटदादा ही सीन च्या मध्ये आले आहेत. असा हा मजेशीर व्हिडीओ शेअर जुईने शेअर केला आहे. त्याखाली जुईने ‘कधी कधी माझ्यात “मिस गडबडघोटाळा” संचारते आणि scene मध्ये अशी गडबड होते, आमचे बिचारे सेटींग दादा सांडलेला चहा साफ करायला माझ्या मागे मागे पळतच आले’ असं कॅप्शन दिलं आहे.
