महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येक माणसाच्या तोंडी आपसूक आहे यांत वादच नाही. आजवर या कार्यक्रमाने केवळ सर्वांचच मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे लाडके कलाकार आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे शेंडेफळ म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. शिवलीने आजवर तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या कार्यक्रमामुळे शिवालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.(Shivali Parab Fan Moment)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मुळे नावारूपाला आलेली सगळ्यांची लाडकी, चुलबुली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. शिवालीचा नटखट अंदाज कायमच प्रेक्षकांना विशेष भावतो. शिवालीच्या मोना डार्लिंग, शिवाली अवली कोहली या पात्रांना तर चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळालं. अभिनयासोबतच शिवाली तिच्या फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते.
पाहा चाहतीच शिवालीसाठीच गोड सरप्राईज (Shivali Parab Fan Moment)
अशातच शिवालीच्या एका चाहतीने शिवालीला गोड असं सरप्राईझ दिल आहे. शिवालीने चाहतीने दिलेल्या गोड सरप्राईजचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. आणि त्याखाली आभार व्यक्त करत छान असं कॅप्शनही दिल आहे. चला पाहुयात शिवालीला नेमकं कोणतं खास गिफ्ट मिळालं आहे.(Shivali Parab Fan Moment)
हे देखील वाचा – जुईचा पडद्यामागचा घोटाळा आणि सेटवर खळबळ
या व्हिडिओसोबत अभिनेत्री शिवाली हिने आभार व्यक्त करत कॅप्शन देत म्हटलंय की, मेघना राणे यांनी माझं सुंदर असं चित्र काढलेला आहे. थँक यु सो मच मेघनाजी…बर तुमचं जितकं प्रेम आहे त्याहून जास्त माझं प्रेम आहे तुमच्यावर, अशीच चित्रं काढत राहा माझी असं म्हणत त्या चिमुकल्या चाहतीचे आभार मानले आहेत.(Shivali Parab Fan Moment)
शिवालीने आजवर तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र शिवाली सध्या ट्रोलींगमुळे विशेष चर्चेत आली आहे. तोकडे कपडे घालण्यावरून शिवालीला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र तोकडे कपडे हे बॉलिवूडमध्ये पाहून नेटकर्यांना पसंत पडत मात्र आपल्या मराठी कलाकारांनी असं काही केलं की ते ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडतात. अद्याप शिवालीने नेटकऱ्यांच्या या प्रश्नांना काहीही उत्तर दिलेलं नाही.