कलाकार पडद्यावर साकारत असलेल्या भूमिकांमुळे त्यांना ओळख,प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत.असचं आपल्या निरागस आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.जुईने आज वर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.(Jui Gadkari Daily Routine)
‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील जुईच्या ‘कल्याणी’ या भूमिकेला भरपूर प्रेम मिळालं त्यानंतर आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून जुईने कमबॅक केले.आणि तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरत आहे.पंरतु आपल्या या लाडक्या अभिनेत्रीच दिवसभराचं शेड्युल कसं असत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.
पाहा काय असतं जुईचं डेली रुटीन? (Jui Gadkari Daily Routine)
म्हणूनच जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तीच दिवसभराच्या शेड्युलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जुई दिवसभरात काय काय करते हे तिने दाखवलं आहे.एकदम तारेवरची कसरत असं कॅप्शन जुईने या व्हिडिओला दिल आहे.अभिनेता अमित भानुशाली, विकास पाटील यांनी कमेंट करून जुईच कौतुक केलं आहे .
सकाळी लवकर उठून स्वतःच्या हाताने सागर संगीत जेवण जुई डब्यासाठी बनवते. त्यानंतर देवपूजा करून ती शूट साठी निघते. त्यानंतर सिन साठी तयार होऊन शूट करते,शूट नंतर संध्याकाळी ६:३०-७ च्या दरम्यान जुई जेवते. आणि शूट वरून घरी आल्यावर. आधी केलेला मेकअप काढते.तिचा स्वतःचा मी टाइम ती एन्जॉय करते. आणि देवाचे आशीर्वाद घेऊन तीचा दिवस संपतो.(Jui Gadkari Daily Routine)
कलाकार म्हंटल की बरेच गैरसमज देखील असतात. परंतु जुईची ही तारेवरची कसरत पाहून. पडद्यावर सायली म्हणून जितकी जुई गुणी आहे तितकीच तिच्या खऱ्या आयुष्यातही गुणी असल्याचं पाहायला मिळत. ही तारेवरची कसरत सांभाळून जुई प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते आहे.
हे देखील वाचा : ‘चाळिशीतली बंगाली महिला हवी’ म्हणून जुईला दिला नकार