शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्मिता तांबेकडे राहण्यासाठी नव्हते घर, पुष्कर श्रोत्रीने केली होती मदत, स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “हा दिवस मी आयुष्यात…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 31, 2023 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
jogwa fame smita tambe had no house to live that time actor pushkar shrotri helped her actress shared incident in interview

स्मिता तांबेकडे राहण्यासाठी नव्हते घर, पुष्कर श्रोत्रीने केली होती मदत, स्वत: सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "हा दिवस मी आयुष्यात..."

‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘देऊळ’ अशा चित्रपटातुन प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिताने केवळ मराठी नव्हेच तर ‘सिंघम रिटर्न्स’, ‘पंगा’ अशा हिंदी चित्रपटातदेखील भूमिका साकारल्या आहेत. आजवर अनेक नॉन-ग्लॅमरस भूमिका साकारुनदेखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडणारी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयानं चर्चत राहणारी ही अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Smita Tambe Interview)

‘जोरम’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने लेट्सअपबरोबर साधलेल्या संवादात या चित्रपटात तिचा काम करण्याचा अनुभव, पुरस्कार, सोशल मीडिया, संघर्ष, त्याचबरोबर तिने खऱ्या आयुष्यात तसेच पडद्यावर साकारलेल्या आईपणाचा अनुभवाबद्दल मोकलेपणाने संवाद साधला. यावेळी तिने तिच्या स्ट्रगलचा एक किस्सा शेअर केला. यावेळी स्मिताने तिच्या मुंबईमध्ये राहण्याच्या संघर्षाविषयी सांगितले. मुंबईत एकेकाळी स्मिताला रहायला घर नसताना याकाळात तिला अभिनेता पुष्कर श्रोत्रीने तिला मदत केले असल्याचे सांगितले.   

यावेळी ती असं म्हणाली की, “प्रत्येक कलाकाराचा जन्म हा संघर्षातून होत असतो. यानिमित्ताने मला माझा किस्सा सांगावासा वाटतो. मी पुण्याहून मुंबईला एक मोठी बॅग घेऊन निघाले होते. कारण मुंबईत कोणत्या ठिकाणावरून कधी निघावं लागेल हे सांगता येत नाही. एका रात्री माझ्या डोक्यावर छत नव्हते. तेव्हा मला माहीत नव्हतं की मी कुठे जाणार आहे किंवा कुठे जाणार आहे. त्यादिवशी मी विलेपार्ले स्टेशनवर जवळपास ७ ते ८ तास बसले होते. त्यादिवशी मी कुठे जाऊ? हा प्रश्न पडला होता. कारण मी ज्यांच्याकडे राहत होते ते अचानक कुलूप लावून निघून गेले. कारण ते तेव्हा माझ्याशी काही संवाद साधू शकत नव्हते आणि यात मला त्यांना काहीच बोलायचे नाही आहे. त्यांना कदाचित मला त्यांना सांगता आले नाही. त्यादिवशी मी पार्ले स्टेशनवर ७-८ तास बसून होते आणि खूप पाऊस लागत होता. त्यामुळे काय करावं? कुठे जावं? या विचारात मी होते.”

View this post on Instagram

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

त्यापुढे ती असं म्हणाली की, “त्यानंतर मी दीनानाथ नाट्यगृहात गेले. त्यादिवशीचा शेवटचा प्रयोग संपल्यानंतर ते मला बाहेर काढतील. याच विचारात होते. तेव्हा प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री हे त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा सराव आटोपून बाहेर निघत असताना पुष्करने मला पाहिले आणि तु इथे काय करते आहेस? असं मला त्याने विचारलं. यावर मला त्याला उंटतर देता येईन म्हणून मी त्याला काहीही म्हटले नाही. त्यावर तो मला त्याच्या गाडीत बसवून घरी घेऊन गेला. घरी जाताच त्याच्या बायकोने मला भात आणि माश्याचं कालवण खायला दिलं. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की आता ७-८ तासांपूर्वी माझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं आणि लगेच मला पुष्कर त्याच्या घरी घेऊन गेला. त्यामुळे हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.”

या मुलाखतीत स्मिताने तिच्या आयुष्यातील प्रवासाविषयी आणि तिच्या ‘७२ मैल प्रवास’, ‘जोगवा’ या चित्रपटांबद्दलचेही काही किस्से सांगितले. तसेच तिच्या ‘जोरम’ चित्रपटातील अनुभवाचेही कथन केले. तिच्या या चित्रपटातील भूमिकेविषयीदेखील तिने मनमुराद गप्पा मारल्या. दरम्यान, गेले काही दिवस स्मिताने मराठीत चित्रपट केला नसल्यामुळे तिचे अनेक चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत.        

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newssmita tambe
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Savita Malpekar Shared Casting Couch Incident

"माझे अंतर्वस्त्र दिसावे म्हणून त्यांनी…", मराठी मालिकेमध्ये काम करण्यावरुन सविता मालपेकरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "इतका त्रास दिला की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.