अनेक दिवसांपासून प्रेक्षक शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. ७ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने बक्कळ कमाई केली. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला पाहण्यासाठी गर्दी केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली. जगभरात आता या चित्रपटाची चर्चा सुरु असून आतापर्यंत या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Jitendra Awhad On Jawan Movie)
‘जवान’ चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग्स वायरल होत आहेत. ‘खर्याखुर्या’ विषयावर परखडपणे भाष्य करून ‘जवान’ चित्रपटाने वास्तवाचं भान साऱ्यांना करून दिलं. चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगही सध्या चर्चेत आहे. या मोनोलॉगमुळे व चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या वास्तविकतेमुळे याबद्दल होणाऱ्या चर्चेला एक राजकीय रंग चढला आहे.
The the first lot of youngsters of kalwa-mmbra will go and watch the movie #JAWAN tmrw at 7pm at Viviana Mall .Thana@iamsrk @iamsrk pic.twitter.com/jiM85eJcGP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 12, 2023
काही राजकीय नेत्यांनी हा चित्रपट ‘गदर २’प्रमाणे संसदेत दाखवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चित्रपटाला पाठिंबा दर्शविलेला पाहायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड यांचा कळवा, मुंब्रा व ठाणे या शहरात दबदबा असून त्यांनी कळवा मुंब्रामधील तरुणांना एक खास भेट दिली आहे.
याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून ट्विट करून दिली. कळवा, मुंब्रा परिसरातील तरुण मुलांसाठी ‘जवान’ चित्रपटाची मोफत तिकिटे वाटप करण्यात आली. शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट विवियाना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांच्यासह बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला, असल्याचं सांगितलं जात आहे.