शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अतिशय वाईट चित्रपट…”, नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, “कुवत नसताना…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 13, 2023 | 1:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nana Patekar on Nepotism in Bollywood

"अतिशय वाईट चित्रपट…", नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, "कुवत नसताना…"

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला असून ते यामध्ये आयसीएमआरचे माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. ज्यांनी देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याच्या टीमचे नेतृत्व केले होते. चित्रपटाच्या ट्रेलरमधून नाना यांची झलक पाहायला मिळाली आहे. त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. (Nana Patekar on Nepotism in Bollywood)

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकरसह चित्रपटातील अन्य कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी बॉलिवूड व सिनेसृष्टीतील अनेक बाबींवर बोलताना बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील ते स्पष्टपणे बोलले आहे. नाना पाटेकर यावेळी म्हणाले, “आता मी एक अभिनेता आहे, आणि माझ्या मुलालासुद्धा अभिनेता व्हायचं आहे. भलेही समोरच्या व्यक्तीची कुवत असेल किंवा नसेल, प्रेक्षकांवर असले चित्रपट लादले जातात. एक चालला नाही, लगेच दुसरा चित्रपट. दोन्ही चित्रपट पडले, तर असे आणखी १० चित्रपट तयार होतील. काही काळाने लोक अशा कलाकारांना स्वीकारतात.”

हे देखील वाचा – जितेंद्र आव्हाड शाहरुख खानच्या पाठिशी, ‘जवान’बाबत केलं ट्वीट, म्हणाले, “मुंब्रा-कळव्यामधील तरुणांसाठी…”

View this post on Instagram

A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)

“मग एक दिवस हे कलाकार १० चित्रपट बनवून आपल्या डोक्यावर बसतात. त्यांचे अतिशय वाईट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला लागतात. मात्र, अशा परिस्थितीत जेव्हा ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट तुमच्यासमोर येतो, तेव्हा या दोन्ही चित्रपटांमधील फरक दिसून येतो.”, असे नाना पाटेकर या कार्यक्रमात म्हणाले.

हे देखील वाचा – “वास्तविकता पडद्यावर मांडायला…”, शाहरुख खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “खूप दिवसांनी…”

नाना पाटेकर यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून यामध्ये नानासह अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन व अन्य बडे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: bollywoodnana patekarnepotismThe Vaccine War
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
amruta fadnavis song

“उपमुख्यमंत्र्यांची पत्नीच हे करु शकते”, न्यूयॉर्कमध्ये गाणं गाण्यावरुन अमृता फडणवीस ट्रोल, नेटकरी म्हणतात, “आता तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.