बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेले आहेत. नाना पाटेकर या चित्रपटात आयसीएमआरचे माजी महासंचालक बलराम भार्गव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कालच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शनानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी नाना पाटेकरांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. (Nana Patekar on Jawan Movie)
अभिनेते नाना पाटेकर यांनी काल झालेल्या ट्रेलर लाँच सोहळ्यात चित्रपटसृष्टी व बॉलिवूड चित्रपटांवर स्पष्टपणे बोलले, शिवाय त्यांनी एका चित्रपटाचं नाव न घेता त्याची खरपूस समाचार घेतला. नाना पाटेकर म्हणाले की, “अलीकडेच सध्याचा हिट चित्रपट पाहायला मी चित्रपटगृहात गेलो होतो. पण, खरं सांगू का? तो चित्रपट मी पूर्णपणे पाहू शकलो नाही. पुन्हा तेचतेच विषय दाखवून प्रेक्षकांना गृहीत धरलं जात आहे. वेगळे, विषय दाखवले जात नाहीत”. लोक या वक्तव्याचा शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाशी जोडत आहे, जो नुकताच यंदाचा सर्वात हिट ठरला आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी नानांनी सनी देओलच्या ‘गदर २’च्या प्रीमियरला हजेरी लावली होती.
हे देखील वाचा – परदेशात गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला विमानतळावर काढावी लागली रात्र, म्हणाला, “६.३०चं विमान…”
तर, समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांमधील फरकांबाबत बोलताना नाना म्हणाले, “एकेकाळी समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये जो फरक होता तो आता राहिलेला नाही. कारण, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक चित्रपटांना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे. आमच्याकडे जितके प्रेक्षक होते, तितकेच पैसे आम्हाला यायचे. त्यामुळे सध्या समांतर चित्रपटाची अवस्था वाईट आहे.”
हे देखील वाचा – वडील घरी येईपर्यंत स्पृहा जोशी गुपचूप बनवायची मासे, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “त्यांचा आक्षेप…”
दरम्यान, नाना यांना ‘वेलकम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागात न घेतल्यामुळे प्रेक्षक व चाहते नाराज आहेत. त्यावरून त्यांनी यावेळी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पण, ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते तब्बल ६ वर्षानंतर हिंदी चित्रपटात झळकणार आहेत.