मंगळवार, एप्रिल 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जय दुधाणेच्या वडिलांच्या अचानक निधनानंतर मराठी कलाकारही हादरले, सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली, म्हणाले, “खूपच धक्कादायक…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jay Dudhane father passed away Utkarsha Shinde, Gayatri Datar, Vikas Patil and many actors expressed their condolence

जय दुधाणेच्या वडिलांच्या अचानक निधनानंतर मराठी कलाकारही हादरले, सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली, म्हणाले, "खूपच धक्कादायक..."

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले आहे. जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत मी माझा सुपरहिरो गमावला असल्याची भावूक प्रतिक्रिया जयने व्यक्त केली. जयने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते”.

जयने वडिलांच्या निधनाबद्दलची पोस्ट शेअर करताच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जयचे अनेक मित्रपरिवाराने त्याला कमेंट्सद्वारे खंबीर राहण्याविषयीही सांगितले आहे. गायत्री देशमुख, पूर्वा शिंदे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शाह, आरोह वेळणकर, अक्षय वाघमारे आदी अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे जयला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा – “कृपया प्लास्टिकचा वापर टाळा”, ‘ती’ भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “दुसऱ्यांना दोष देतो आणि…”

गायत्री दातारने जयला आधार देत असं म्हटलं आहे की, “ही बातमी पाहून वाईट वाटले. तुझ्या वडिलांचा पुढचा प्रवास शांतमय होवो. तुला या कठीण काळातून पुढे जाण्यासाठी देव बाल देवो. ओम शांती” तर उत्कर्षने जयच्या वडिलांबद्दल त्याचया भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “एक महान आत्मा सर्वकाळ सर्वांची सेवा करतो. महान आत्मा कधीही मरत नाही. आम्ही तुझ्या वडिलांची काय आठवण काढू. जय माझ्या भावा या कठीण काळात खंबीर रहा मित्रा”. तसेच विकास पाटीलनेही “या कठीण काळात आम्ही सर्व तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाबरोबर आहोत”.

आणखी वाचा – प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

तसेच आरोह वेळणकरने या पोस्टखाली “ही खूपच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. देव तुला शक्ती देवो. आम्ही सर्व तुझ्यारोबर आहोत. ओम शांती” अशी कमेंट केली आहे. यासह अनेक कलाकारांनी  या पोस्टखाली ऑम शांती, खूपच दु:खद बातमी, तुला देव शक्ती देवो” अशा अनेक कमेंट्सद्वारे जयचे सांत्वन केलं आहे. त्याचबरोबर त्याला या कठीण काळात खचून न जाता खंबीर राहण्याचा प्रेमल सल्लाही दिला आहे.   

Tags: Jay Dudhane father passed awayJay Dudhane father passed away Marathi newsJay Dudhane father passed away news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Gayatri Datar Wedding
Entertainment

Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

एप्रिल 27, 2026 | 2:34 pm
Rohan Gujar Twins Baby
Entertainment

‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

एप्रिल 27, 2026 | 12:12 pm
Riteish Deshmukh to Bageshwar Baba
Entertainment

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

एप्रिल 27, 2026 | 11:11 am
Next Post
Rapper naezy commented on Ranveer Singh's film gully boy success harm him

“‘गल्ली बॉय’ चित्रपटामुळे माझे नुकसान”, रॅपर नेझीचा मोठा खुलासा, म्हणाला, “नकारात्मक नजरेने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.