सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘गल्ली बॉय’ चित्रपटामुळे माझे नुकसान”, रॅपर नेझीचा मोठा खुलासा, म्हणाला, “नकारात्मक नजरेने…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 5:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rapper naezy commented on Ranveer Singh's film gully boy success harm him

“‘गल्ली बॉय’ चित्रपटामुळे माझे नुकसान”, रॅपर नेझीचा मोठा खुलासा, म्हणाला, “नकारात्मक नजरेने...”

मनोरंजन विश्वातला सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. टीव्हीवरील हाच लोकप्रिय शो आता ओटीटीवरही गाजत आहे. हा शो नुकताच सुरु झाला असून सध्या या शोची व शोमधील स्पर्धकांची चांगलीच चर्चा सुरु आहे. या शोमध्ये हिप-हॉप कलाकार नावेद शेख उर्फ ​​रॅपर नेझीही सहभागी झाला आहे. नुकतंच त्याने घरातील इतर स्पर्धकांशी ‘गली बॉय’ या चित्रपटाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर सिंगने एका रॅपरची भूमिका साकारली आहे, जी नेझीच्या आयुष्यावर आधारित आहे असं प्रेक्षकांना वाटलं.

‘गली बॉय’ चित्रपटाचा आणि त्याच्या यशाचा रॅपर नेझीच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? हे सांगताना नेझी असं म्हणाला की, “माझे पहिले गाणे हिट झाले असले तरी या चित्रपटातून मी प्रसिद्ध झालो. यामुळे मला मुख्य प्रवाहातील प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. या चित्रपटामुळे मला फायदा झाला असला तरी नुकसानही झालं. माझ्या मानसशास्त्रावर, वैयक्तिक आयुष्यावर याचा परिणाम झाला. मला दोन मैत्रीणी असलेल्या या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, मीए गरीब दाखवलो आहे, जे मी कधीच नव्हतो”.

View this post on Instagram

A post shared by Naezy (@naezythebaa)

यापुढे नेझी असं म्हणाला की, “ही एक काल्पनिक कथा असल्याचे निर्मात्यांनी सांगूनही, प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग ती कथा माझीच असल्याचे मानत राहिला. लोक माझ्याकडे नकारात्मक नजरेने पाहू लागले. चित्रपटातील पात्राशी, माझ्या प्रवासाची तुलना करू लागले. त्यांना ही माझी कथा वाटली. रणवीर जे काही करत आहे, तो मीच आहे असं त्यांना वाटत राहिलं”.

आणखी वाचा – प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

तसेच यापुढे नेझी अभिनेता रणवीर सिंगसोबतच्या बॉण्डबद्दल बोलताना असं म्हणाला की, “शुटिंगदरम्यान आम्ही खूप चांगले मित्र झालो. तो माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना भेटला आणि आम्ही एकत्र फोटो काढले. त्यांनी माझी दीपिका मॅडमशीही ओळख करून दिली”.

आणखी वाचा – “कृपया प्लास्टिकचा वापर टाळा”, ‘ती’ भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “दुसऱ्यांना दोष देतो आणि…”

दरम्यान, नेझीने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये खुलासा केला की, झोया अख्तरने नेझीचे ‘आफत’ गाणे ऐकले होते आणि त्याद्वारे त्याचा शोध घेतला होता. झोया यांना हे गाणे आणि हा प्रकार खूप आवडला. हा चित्रपट एका काल्पनिक कथा व संपूर्ण समाजावर आधारित होता.

Tags: bigg boss ottNaved Shaikh aka Rapper NaezyNezi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Kaun Banega Crorepati 15

…अन् बिग बींनी पाळला शब्द, KBC मधील स्पर्धकाबरोबर डिनर करण्याचं दिलं होतं वचन, अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केली इच्छा आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.