शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prince Narula and his wife Yuvika Chaudhary announced pregnancy after 6 years of marriage.

प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आवडते जोडपे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविकाच्या एक लहान मुल येणार आहे. प्रिन्स व त्याची अभिनेत्री पत्नी युविका चौधरी लवकरच आई-बाबा होणार आहेत. युविका गरोदर असून हे जोडपं लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रिन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रिन्स व युविका यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

प्रिन्सने त्याच्या सोशल मीडियावर बाळाबद्दलची खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “सर्वांना नमस्कार, सध्या मला माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे कळत नाहीये. आम्ही एकाच वेळी खूप आनंदी व त्याचबरोबर चिंताग्रस्त आहोत. आम्ही देवाचे आभारी आहोत आणि लवकरच आम्ही आई-बाबा होणार आहोत, त्यासाठी खूप उत्साहीदेखील आहोत. कारण, प्रविका (प्रिन्स-युविका यांचे बाळ) लवकरच येणार आहे. युविका आता तू माझ्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असशील, कारण आपल्या आयुष्यात येणारं बाळ आपल्या सर्वांची प्राथमिकता असेल”.

View this post on Instagram

A post shared by PRINCE YUVIKA NARULA ❤️❤️❤️ (@princenarula)

आणखी वाचा – अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

यापुढे त्याने “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण काही दिवसांनी तू नाही तर ते बाळ माझी प्राथमिकता असेल. मी खूप आनंदी आहे की, ज्याच्यासाठी मी एवढी मेहनत केली आहे, ते सगळं मी बाबा झाल्यावर त्याच्यासाठी असेल. सर्व आई-बाबांची असतात, त्याप्रमाणे माझीही स्वप्नं होती. जसं आमच्या पालकांनी आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला चांगली माणसं बनवलं, तसाच प्रयत्न आम्हीही आमच्या बाळासाठी करु” असं म्हणत त्याने त्याच्या बाळाबद्दल या पोस्टद्वारे उत्सुकता दाखवली आहे. प्रिन्सने शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर  त्यांच्या अनेक चाहत्यांनीही त्यांना आई-बाबा होण्याबद्दल कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी?, भाऊ कुशनेच  सांगितलं सत्य, म्हणाला, “उपस्थित नव्हतो असं…”

दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

Tags: Bigg Boss Famebollywood newsPrince NarulaPrince Narula Yuvika Chaudhary Chaudhary announced pregnancyYuvika Chaudhary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.