Jay Maahi Daughter: काही कलाकार जोड्या जितक्या प्रसिद्ध असतात. तितकीच त्यांची मुलं देखील लहान वयापासूनच प्रसिद्धीचा अनुभव घेत असतात. अशीच हिंदी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे अभिनेता जय भानुशाली व अभिनेत्री माही वीज. ‘नचबलिये’ या हिंदी रिऍलिटी शो मधून ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक जोडी झाली.(Tara Bhanushali)
जय व माही यांची लेक ताराला अगदी लहानपानसुनच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आलं आहे. ३ ऑगस्ट ला ताराचा चौथा वाढदिवस होता. ताराचा चौथा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. तिच्या वाढदिवसाच्या सिलिब्रेशनचे अनेक फोटोज,व्हिडिओज जय व माहिने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.
तारा झळकली न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर (Tara Bhanushali)
ताराच्या वाढदिवसाचं निमित्त साधत जयने एक व्हिडिओ शेअर करत आणखी एक आनंदाची बातमी दिली.वाढदिवसाची खुप मोठी भेट ताराला मिळाली आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षात न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर तारा झळकली. जयने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये म्हंटल आहे, “जेव्हा मी म्हणतो की मला माझ्या मुलीसारखं चाहत्यांचं प्रेम हवं आहे तेव्हा माझं म्हणणं हे असतं.” काही दिवसांपूर्वी साऊथ मधील सुपरस्टार महेश बाबू यांची लेक सितारा देखील वयाच्या ११ व्या वर्षी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली.सिनेसृष्टीतील भारताच्या लेकीचं लहान वयातील हे यश नक्कीच वाखाण्याजोगं आहे. (Jay Maahi Daughter)

हे देखील वाचा : तब्बल २० वर्षांनी चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित होणार ‘कोई मिल गया’, कुठे व कधी पाहता येणार चित्रपट?
लहान वयापासूनच ताराचा चाहता वर्ग मोठा आहे.माही तिच्या सोशल मीडियावरून तारा सोबतचे अनेक फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते.इंस्टाग्राम वर देखील ताराचे साडे तीन लाख इतके फॉलोवर्स आहेत.जय,माहीच्या लग्नाला अनेक वर्ष झाल्यांनतर ताराचा जन्म झाला.ताराच्या जन्मापूर्वी त्यांनी खुशी आणि राजवीर यांचे पालक बनण्याचा निर्णय घेतला.