रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तब्बल २० वर्षांनी चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित होणार ‘कोई मिल गया’, कुठे व कधी पाहता येणार चित्रपट?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 4, 2023 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
koi mil gaya re release

तब्बल २० वर्षांनी चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित होणार 'कोई मिल गया', कुठे व कधी पाहता येणार चित्रपट?

Koi Mil Gaya Re release : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा २००३ झाली प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ हा भारतातील पहिला सुपरहिरो चित्रपट होता. येत्या ८ ऑगस्टला या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्ताने प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (Koi Mil Gaya Re release)

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार अशी माहिती मिळतंय की, PVR आयनॉक्स ही मल्टिफ्लेक्स कंपनी राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोई मिल गया’ चित्रपट ४ ऑगस्टपासून देशभरातील ३० शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, की हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सच्या टीमने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या कल्पनेला मीही लगेच सहमती दर्शवली.”

पुढे चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना राकेश रोशन म्हणाले, “‘कोई मिल गया’ चित्रपट आम्हाला लहान मुलांसाठी बनवायचा होता. मात्र ज्याचा आनंद लहान मुले आणि त्यांची कुटुंबीय दोघेही घेऊ शकतात. एलियन्सवर सायन्स फिक्शन फिल्म बनवणं हा चित्रपट निर्माता म्हणून मी घेतलेला जोखमीचा निर्णय होता. पण त्या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. त्यामुळेच मला अश्या पद्धतीचे चित्रपट बनवण्याचा आणि प्रयोगशील असण्याचा माझा विश्वास दृढ झाला.”

हे देखील वाचा – विमानतळावर मुद्दाम सेलिब्रिटींची अधिक तपासणी करतात समीर वानखेडे? म्हणाले, “एअरपोर्टवर असताना…”

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हे देखील वाचा – सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा अजब कारभार, लाखो रुपयांना विकलं नकली ब्रॅण्डचं घड्याळ, गुन्हा दाखल

८ ऑगस्ट २००३ रोजी ‘कोई मिल गया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. चित्रपटाची कथा रोहित या पात्राभोवती फिरत असून ज्यात त्याच्या आयुष्यात ‘जादू’ नावाचा एलियन येतो. चित्रपटात हृतिकसह प्रीती झिंटा, रेखा, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि हंसिका मोटवानी आदी मुख्य भूमिकेत होते. पुढे याच कथेच्या पात्रांवर ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ हे चित्रपट बनले असून लवकरच याचा पुढचा भाग ‘क्रिश ४’ ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Koi Mil Gaya Re release)

Tags: bollywood moviehritik roshankoi mil gayaKoi Mil Gaya Re-release
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
nitin desai funeral

आत्महत्येपूर्वी लिहिली चिट्ठी अन्...; नितीन देसाईंची शेवटची इच्छा काय होती? कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.