बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. आता शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटांच्या जोरदार तयारीला लागला आहे. त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच चित्रपटाबाबत आता एक वेगळीच घटना घडली आहे. (Jawan Movie Clip viral)
यानिमित्त शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आतापर्यंत पोस्टर व पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लवकरच चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, हे सर्व सुरु असताना चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील काही क्लिप्स चोरीला गेल्या असून त्या ऑनलाईन लीक झाली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा – महिलेने पैसे मागताच शाहरुख खानच्या लेकीने काय केलं पाहा; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “अगदी बापावर…”
रेड चिलीज एंटरटेनमेंटने काही जणांवर ‘जवान’ चित्रपटाच्या क्लिप चोरून त्या ऑनलाइन लीक केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ लीक करणाऱ्या पाच ट्विटर हँडलची ओळख पटली असून त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याआधीही जवानची क्लिप ऑनलाइन लीक झाली होती, तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व प्लॅटफॉर्म्सवरून ‘जवान’चे क्लिप काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
हे देखील वाचा – ‘गदर २’ च्या प्रीमिअरला नाना पाटेकरांची हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल..
शाहरुखच्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन एटली यांनी केले असून संगीत अनिरुद्धने दिले आहे. चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा व अन्य कलाकारही दिसणार आहे. (Jawan Movie Clip viral)