मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा सावंत. २०१०मध्ये ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटामधून तिला खरी ओळख मिळाली. दगडी चाळ, लपाछपी सारख्या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पूजा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. पूजा लग्न कधी करणार? तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे? असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर पूजाने यावर आता उत्तर दिलं आहे.(Pooja Sawant on her Ideal Life Partner)
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये पूजाने हजेरी लावली होती. पूजाच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेत तिने अभिनय क्षेत्राबद्दलही बरेच प्रश्न विचारले. विशेष म्हणजे या सर्व प्रश्नात लग्न या संकल्पनेबद्दलचे प्रश्न आणि तिने दिलेली उत्तरं लक्ष वेधणारी ठरली.
वाचा – लग्नाबाबत काय आहे पूचाचं मत?(Pooja Sawant on her Ideal Life Partner)
तिला लग्न संस्थेवर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “ आपल्याकडे सगळ मॉडर्न झालं आहे आणि जे एका अर्थी चांगलंच आहे. तो या पिढीचा वेगळेपणा आहे. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी परंपरेनुसार चालत आल्या आहेत त्या तशाच असाव्यात. त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे परंपरेनुसार मला लग्न करायचं आहे”.
आणखी वाचा – कार्तिक आर्यन २०२३च्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार? करण जोहरच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
पुढे नात्यांबद्दल बोलताना पूजा म्हणाली, “ सध्याची नाती फार अस्थिर झाली आहेत. तो अस्थिरपणा सगळ्यात दिसतो. पण मला असा लाईफ पार्टनर पाहिजे जो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. ज्याच्याबरोबर मी आयुष्यभर अगदी आनंदात राहीन”.
पुढे ती म्हणाली, “माझ्या लाईफ पार्टनरसाठी साध्या आणि माफक अपेक्षा आहेत. जो मला सांभाळेल आणि जो मला दुखावणार नाही असा लाईफ पार्टनर मला पाहिजे. पैसा कोणीही, कधीही कमवू शकतो. पण मला सांभाळेल, माझे मूड, आनंद, रडणं या सगळ्यात जो माझ्याबरोबर असेल असा व्यक्ती माझ्या आयुष्यात हवा आहे. प्राणीप्रेमी नसला तरीही ते कौशल्य मी त्याला शिकवेन”. पूजाने तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे? याचा खुलासा केला.