साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती बॉलीवूड स्टार शाहरुख खानसह स्क्रीन शेअर करणार आहे. शिवाय, हा तिचा पहिला बॉलीवूड चित्रपटदेखील असणार आहे. नयनतारा या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिची झलक दिसली आहे. (Nayanthara instagram debut)
दरम्यान, चाहत्यांची ही लाडकी अभिनेत्री जरी सोशल मीडियावर दिसत असली, तरी तिचे कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट नव्हते. पण आता अभिनेत्रीने नुकतंच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. शिवाय, सोशल मीडियावर पदार्पण करताच तिचा एक व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
नयनताराने तिचं इंस्टाग्राम अकाउंट उघडल्यानंतर लगेच एक रील पोस्ट केला. ज्यामध्ये ती तिच्या जुळ्या मुलांना हातात घेऊन चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओतून अभिनेत्रीने तिच्या मुलांचा चेहरा पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हणाली, “त्यांना सांगा मी आली आहे.” तिच्या या पोस्टवर पती व दिग्दर्शक विग्नेश सिवान याने कमेंट करत नयनताराचे सोशल मीडियावर स्वागत केले आहे. तसेच, चाहतेही या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – हास्यजत्रेतील कलाकारांकडून प्राजक्ताला खास गिफ्ट म्हणाली “नवीन फार्महाऊस….”
अभिनेत्री नयनताराने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी ती दिग्दर्शक विग्नेश सिवानसह लग्नबंधनात अडकली असून दोघांना उयीर आणि उलग ही दोन जुळी मुलं आहेत. दरम्यान, नयनताराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र तिचे कोणतेही सोशल मीडिया अकाउंट आजपर्यंत नव्हते. ती तिच्या पतीसोबतचे अनेक फोटोज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करायची.
हे देखील वाचा – “आली ड्रामेबाझ” उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल; म्हणाले, “नागपूरात वेड्यांसाठी…”
काही दिवसांपूर्वी नयनताराने तिचे पती व मुलांसह ओणम सण साजरा केला होता. ज्याचे फोटोज समोर आले होते. शिवाय, या फोटोजमध्ये ती नेहमीच तिच्या मुलांचे चेहरे लपवायची. आता मात्र, अभिनेत्रीने मुलांसह सोशल मीडियावर पदार्पण केल्याने चाहते प्रचंड खुश झाले आहेत. (Nayanthara instagram debut)