शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रंग माझा वेगळा’ मालिका निरोप घेणार असल्याने अभिनेत्री रेश्मा शिंदे भावुक, म्हणाली, “ही गोष्ट कायम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 31, 2023 | 5:45 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Reshma Shinde On Rang Maza Vegla

'रंग माझा वेगळा' मालिका निरोप घेणार असल्याने अभिनेत्री रेश्मा शिंदे भावुक, म्हणाली, "ही गोष्ट कायम…"

एखादी मालिका प्रेक्षकांच्या इतकी पसंतीस पडते की प्रेक्षक ही त्या मालिकेवर प्रेम करू लागतात. मालिकेचं कथानक, मालिकेतील पात्रे ही काही दिवसांनी चाहत्यांच्या जवळची होऊन जातात. मालिकेचा चाहतावर्ग हा मालिकेवर भरभरून प्रेम करणारा असतो. मात्र जेव्हा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी बातमी समोर येते तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्काच बसतो. अशातच प्रेक्षकांनी चार वर्ष भरभरून प्रेम केलेली एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांना धक्काच बसला आहे.(Reshma Shinde On Rang Maza Vegla)

स्टार प्रवाह वाहिनीवरील काही दिवसांपूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका ऑफ एयर गेली. तिच्या पाठोपाठ आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मात्र ही मालिका निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावरून भावुक पोस्ट शेअर करत मालिकेला मिस करणार असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिका होतेय ट्रोल, “तुमचा लेखक कुठे आहे?” नेटकऱ्यांनी केला सवाल, म्हणाले…

मालिका ऑफ एयर जाणार यानिमित्त दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘इट्स मज्जा’ ला मुलाखत दिली. यावेळी ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिला विचारलं गेलं की, ‘सेटवरची एक अशी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील, ती कोणती?”

आणखी वाचा – हास्यजत्रेतील कलाकारांकडून प्राजक्ताला खास गिफ्ट म्हणाली “नवीन फार्महाऊस….”

यावर उत्तर देत रेश्मा म्हणाली की, “लंच टाइम. हा मला कायम लक्षात राहील आहे. जेव्हा सेटवर लंच टाइम होतो तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. असा कुठलाच दिवस नाही की, आम्ही लंच टाइम एकत्र नसतो. कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनात काही घडलं जरी असेल तरी कधी कोणीच लंच टाइम मीस केला नाही. आमच्या तिथे खूप गप्पा होतात. म्हणून आम्ही सरांना सांगतही असतो की, वेळेत ब्रेक करा वगैरे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर हा गोष्टीची मला खूप आठवण येईल.”

Tags: its majjaRang maza veglareshma shindestar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
rakhi spoke about hindu religion

Video: राखीने म्हणून सोडला हिंदू धर्म म्हणाली, “मी खूप नशीबवान…”; हिंदू धर्मावरील ‘या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.