रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमच्यासारख्यांच्या विचारांमुळेच…”, आधी पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा, आता पहलगाम हल्ल्याविषयी बोलताच सनी देओल ट्रोल,

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 23, 2025 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunny deol troll for support Pakistan

पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देण्यावरुन सनी देओल ट्रोल, नक्की प्रकरण काय?

Jammu And Kashmir Pahalgam Terrorist Attack Sunny Deol : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पापांनी आपला जीव गमावला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देशच हादरला आहे. या हल्ल्यामध्ये कोणी पती, कोणी वडील, कोणी मुलगा गमावला. या संपूर्ण घटनेमधून एक महत्त्वाची माहितीही समोर आली. यामध्ये फक्त पुरुषांना टार्गेट केलं गेलं. पुरुष पर्यटकांवर अधिकाधिक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यानची भयावह दृश्य समोर आली आहेत. अशातच कलाकार मंडळीही याबाबत संताप व्यक्त करत आहेत. त्यातच सनी देओलने मृतांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. (sunny deol troll for support pakistan)

काय म्हणाला सनी देओल?

सनी देओलने पोस्ट शेअर करत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “दहशतवाद्यांना संपवणं हाच या देशाचा आता उद्देश हवा. कारण या हल्ल्यांमुळे फक्त सामान्य लोकांनाच त्यांचा जीव गमवावा लागतो. प्रत्येकाला स्वतःला पडताळून पाहण्याची गरज आहे. या घटनेमध्ये मी पीडित कुटुंबियांच्या बरोबर आहे”. सनीने ही पोस्ट करताच कमेंट्सच्या माध्यमातून अनेकांनी त्याला ट्रोल केलं.

आणखी वाचा – “’काश्मीर फाइल्स’ला नावं ठेवली आता तेच झालं”, पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर भडकले, बॉलिवूड कलाकारांचाही संताप

एका युजरने म्हटलं की, “तूच तर पाकिस्तानी कलाकारांना काम द्या असं म्हटलं होतं”. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, “जाट चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तू एक विधान केलं होतं. पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यापासून थांबवू नका. कला ही सगळ्या सीमारेषांपलिकडची असते. तुमच्या सारख्या लोकांच्या अशा विचारांमुळेच हे सारं घडलं आहे”.  सनी देओलला कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. मात्र ट्रोल करण्याची ही वेळ आहे का? हाही मुद्दा यामधून समोर येतो.

आणखी वाचा – “हल्लेखोर स्थानिक मदतीशिवाय पोहोचलेच कसे?, घरात घुसून मारा”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी कलाकार भडकले  

इस समय दुनिया की सोच सिर्फ़ आतंकवाद को खत्म करने की होनी चाहिए क्यूंकि इसका शिकार सिर्फ़ मासूम लोग ही होते है ,इंसान को अपने अंदर झांकने की जरूरत है।
इस दुख की घड़ी में मैं पीड़ित परिवारों के साथ खड़ा हूं।
#PahalgamTerroristAttack

— Sunny Deol (@iamsunnydeol) April 23, 2025

सनी देओलने नक्की काय म्हटलं होतं?

‘जाट’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनी देओलला अभिनेता फवाद खानच्या कमबॅकबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा तो म्हणालेला, “मी या राजकीय विषयांमध्ये बोलू इच्छित नाही. कारण इथूनच अनेक वादांना तोंड फुटतं. आम्ही कलाकार आहोत. दुनियाभर असलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही काम करतो. लोकांनी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही काम करतो. आपल्याला अधिकाधिक देशांचं स्वागत केलं पाहिजे. असंच कायम असलं पाहिजे”. सनीला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Supriya pilgaonkar on pahalgam terror attack

हाताला काळी पट्टी बांधून १३ दिवस दुःख पाळणार, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा निर्णय, म्हणाल्या, “दिखावा नाही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.