अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांच्या बोलण्याच्या स्टाइलने प्रेक्षकांची मनंदेखील जिंकून घेतात. ते चाहत्यांबरोबरच पापाराझींचीदेखील काळजी घेताना दिसतात. मात्र त्यांचा एक वेगळाच अंदाज बघायला मिळाला. जॅकी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. पापाराजीनी जॅकी यांना सैफ अली खानबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी ते बोलत असताना आजूबाजूला खूप गोंधळ सुरु होता आणि त्यामुळे जॅकी यांना राग अनावर झाला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण जॅकी नक्की का चिडले आणि कोणावर चिडले याबद्दल जाणून घेऊया. (jackie shroff on saif ali khan)
जॅकी यांना विचारलं की, “सैफ अली खानवर हल्ला झाला. बॉलिवूड सध्या धोक्यात आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?”, त्यावर जॅकी यांनी उत्तर दिले की, “बॉलिवूड धोक्यात नाही. ही घटना घडली आहे. ही घटना खूप दु:खददेखील आहे. पण याचा अर्थ बॉलिवूडवर हल्ला सुरु आहे असं नाही. जे झालं ते खूप वाईट झालं. पण सैफ लवकर बरा होईल ही मला खात्री आहे. सगळ्यांनीच स्वतःची, घरच्यांची काळजी घ्या. स्वतःची सुरक्षा करा. इमारतीचे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे”.
मात्र जेव्हा जॅकी बोलत असतात तेव्हा त्यांच्या समोर असलेला पापाराझी मोठमोठ्याने त्यांना हाक मारू लागतो. या सगळ्यामुळे जॅकी चिडतात आणि गोंधळ घालणाऱ्यांना शांत राहण्यास सांगतात. सैफवर ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या दोन दिवस आधी संशयिताने शाहरुख खानच्या घरात घुसण्याचादेखील प्रयत्न केला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांच्या हाती लागले होते. तसेच सलमान खानच्या घरावरदेखील गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्याही सुरक्षेमध्ये वाढ केली. या सगळ्या घटनांमुळे बॉलिवूडला धोका आहे असे म्हंटले गेले. मात्र या सगळ्याचे जॅकी यांनी स्वतः खंडन केले.
सैफच्या तब्येतीबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याची मुलं म्हणजे तैमुर व जेहदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. तसेच आई शर्मिला टागोर व बहीण सोहा अली खान पती कुणाल खेमूबरोबर रुग्णालयात पोहोचली. लवकरच त्याला रुग्णालयातून सोडण्यात येईल अशी माहितीदेखील समोर येत आहेत.