मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सध्या सोशल मीडियाचा वापर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक सोशल मीडियाद्वारे ही कलाकार मंडळी त्यांचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. अशातच अनेक कलाकार मंडळींनी गेल्या काही दिवसांत युट्यूबकडे आपला मोर्चा वळवला आहे. युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून ही मंडळी चाहत्यांपर्यंत अनेक नवनवीन गोष्टी शेअर करता असतात. अशीच युट्यूबवर व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारी एक अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहंदळे. झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. या मालिकेत तिचे इंद्राणी हे पात्र होते. (Shweta Mehandale village in Kokan)
अभिनेत्री श्वेता मेहेंदळे व राहुल मेहंदळे ही जोडी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सोशल मीडियावर ही जोडी आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. श्वेता ही अभिनेत्री असण्याबरोबरचं एक व्लॉगरही आहे. तिला फिरण्याची फार आवड आहे. विशेष म्हणजे श्वेता ही अनेकदा बाईक राईडही करते आणि या राईडचे अनेक व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.
अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने शेती केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या कोकणातील गावी गेली असून यात तिने तिच्या कोकणातील भाजीच्या शेतीची खास झलक दाखवली आहे. यावेळी अभिनेत्री स्वत:च्या हातांनी भाजी मोडली आणि घरी येऊन ती शिजवलीही आहे. तसंच या व्हिडीओमध्ये श्वेताच्या गावच्या घराचीही झलक दिसत आहे.
आणखी वाचा – हल्ला होताच करीना कपूर सैफ अली खानला सोडून करिश्मा कपूरच्या घरी का गेली?, म्हणाली, “तो रुग्णालयात जाताना…”
दरम्यान, या व्हिडीओमध्ये श्वेताचा नवराही पाहायला मिळत आहे. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत एकत्र काम होते. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. शिवाय मालिकेलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. छोट्या पडद्यावरुन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत नसले तरी युट्यूबच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.