Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणं व वादांनी झाली आहे, बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक आवडलेली नाही,. कालच्या भागांतही त्यांच्यात अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक आपली पूर्ण ताकद लावत आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये चुरशीशी लढत पाहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस मराठीचा नुकताच नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात आर्या व निक्की यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi Day 5 update)
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात निक्की व आर्या यांच्यात खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे, या नवीन प्रोमोमध्ये आर्या मला घाबरायला पाहिजे असं मोठ्या आवाजात म्हणते. त्यानंतर निक्की तिला “फट्टू आहेस एक नंबरची” असं म्हणते. यावर आर्याही “पागल मुलगी” असं म्हणते. यानंतर वैभव चव्हाण आर्याला “तू का मध्ये पडत आहेस” असं म्हणते. यावर आर्याही “मला शांत नाई करायचं” असं त्वेषाने म्हणते.
अशातच पुढे आर्या व अरबाज यांच्यातही मोठे भांडण होत असल्याचे या नवीन प्रोमोमधून कळत आहे. अरबाज तिला “फालतूच मला सांगायचं नाही” असं म्हणतो. यावर तीही अरबाजला मोठ्या आवाजात “चल चल” असं म्हणतो. यावरुन आजच्या भागात स्पर्धकांमध्ये मोठे भांडण होणार असल्याचे दिसून येत आहे. आता या भांडणात कुणाचा किती निभाव लागणार? कोण कुणावर किती वरचढ ठरणार? हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दरम्यान, कालच्या भागात बिग बॉस’च्या घरातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. घरातील एकूण १६ स्पर्धकांपैकी वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण व पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश होता. आता या पाच सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे येत्या विकेंडच्या वारमध्ये सिद्ध होईल.