‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या लोकप्रिय सीरिजचे एकूण सात भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या भागात मध्या, आभ्या, विक्या व किरण्या यांनी जमेल ते काम करत पैसे जमा केले आणि नुकसान केलेल्या सर्व वस्तू शाळेत आणल्या. मात्र त्यांना शाळेतील तक्त्यांसाठी पैसे कमी पडत होते. त्यामुळे त्यांनी ते तक्ते न घेता इतर सामान न शाळेत नेले. यावेळी त्यांचे कौतुक म्हणून जंगम सरांनी त्यांचे तक्त्याचे पैसे माफ केले आणि तक्ते दिले. तसेच यावेळी त्यांनी सर्व मुलांचे कौतुकही केलं. (Dahavi-A Series daily updates)
यानंतर छोटासा कार्यक्रम करत शिक्षकांनी या मुलांचं शाळेत पुन्हा एकदा स्वागत केलं. अशातच आता सगळी मुलं पुन्हा शाळेत आली आहेत आणि त्यांचे शालेय शिक्षण पुन्हा एकदा सुरु झालं आहे. नुकत्याच झालेल्या भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमज झाले आहेत. सातव्या भागाच्या सुरुवातीला केवडा आभ्याजवळ येते आणि त्याला शिंदे सरांच्या क्लासला न आल्याबद्दल विचारते. तेव्हा आभ्या तिला मला त्यांच्या क्लासला यायला जमणार नसल्याचे सांगतो. यावेळी तो आमच्या घरची परिस्थिती नसल्याचेही तिला सांगतो.
शिंदे सरांच्या क्लास येण्यासाठी अधिकचे पैसे नसल्यामुळे आभ्या येऊ शकणार नाही. ही समजताच केवडा नाराज होते. मात्र आभ्या तिची समजूत काढतो आणि केवडाही समजून घेते. त्यानंतर शाळेत नाटकाची सूचना येते. ज्यात केवडा, आभ्या, किरण्या, मध्या, सागऱ्या, रेश्मा, केवडा, ज्योती व पल्लवी असे सगळेच सहभागी होतात. यावेळी ते शाळेत एक नाटक सादर करतात आणि या नाटकात रेश्मा व केवडा दोघी आभ्याची बायको होतात. मात्र रेश्मा माघार घेत केवडाला त्याची बायको होण्यास सांगते.
त्यानंतर रेश्मा व पल्लवी यांच्यात संवाद होतो. या संवादात पल्लवी रेश्माला असं म्हणते की तुला आभ्याची बायको होण्याची संधी आली होती तर तू झाली का नाहीस?”, यावर रेश्मा तिला उत्तर देत असं म्हणते की, “खऱ्या आयुष्यात त्याची बायको व्हायचं आहे म्हणून आता नाटकात झाली नाही”. त्यामुळे आता पुढील आभ्या-रेश्मा यांच्यातील नात्यात काय बदल होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच पुढील भागात केवडा आभ्याची घरी जाणार असल्याचेही प्रेक्षकांना पाहता येणार आहे