मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात येतात. पण ते अचानक गायबही होतात. यामागे अनेकदा कलाकारांची काही वैयक्तिक कारणे असतात. काही वैयक्तिक कारणां,मुळे ही कलाकार वादात अडकतात आणि मग इंडस्ट्रीतून अचानक गायब होतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे श्वेता बसू प्रसाद. श्वेता बसू प्रसाद झारखंडच्या जमशेदपूरची रहिवासी आहे आणि आता ती पडद्यापासून पूर्णपणे गायब आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी ती आपल्या पतीपासून विभक्त झाली असून एकाकी जीवन जगत आहे. इंडस्ट्रीमध्ये आपल्या शानदार पदार्पणासाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेताने २००२ मध्ये ‘मकडी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Shweta Basu Prasad information)
त्यानंतर ‘कहानी घर घर की’ या टीव्ही शोमधून तिला चांगलीच ओळख मिळाली. ‘बंगारुलोकम’ या तेलुगू चित्रपटातील तिच्या कामामुळे तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. अभिनयाबरोबरच श्वेता लेखिका, डॉक्युमेंट्री डायरेक्टर आणि प्रोड्युसर देखील आहे. ११ जानेवारी १९९१ रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेली श्वेता तिच्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आली. त्यानंतर २०१४ मध्ये, श्वेताच्या आयुष्यात मोठा बदल झाला, जेव्हा तिला हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली.
आणखी वाचा – अर्चना पुरन सिंह यांचा सेटवर मोठा अपघात, हाताला गंभीर दुखापत, आईची अवस्था पाहून मुलांनाही कोसळलं रडू
मात्र, या घटनेमागील सूत्रधार पकडल्यानंतर श्वेताला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले आणि तिच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. या वादामुळे श्वेताच्या करिअरवर परिणाम झाला असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्याकडेही सर्वांचे लक्ष गेले. २०१७ मध्ये, तिने चित्रपट निर्माता रोहित मित्तलबरोबर लग्न केले आणि २०१८ मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नाच्या एका वर्षातच २०१९ मध्ये दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतरही तिची रोहितशी चांगली मैत्री असल्याचे तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने खुलासा केला की, त्यांचे वेगळे होणे तितके दुःखदायक नव्हते. दरम्यान, अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद ही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे. पण तिच्या आयुष्यात झालेले अनेक वाद, यामुळे ती इंडस्ट्रीपासून लांब गेली आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होऊनही एका चुकीमुळे अभिनेत्रीची वैयक्तिक व व्यावसायिक कारकीर्द पूर्णपणे बदलली.