बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्याबद्दल रोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर आता तो सुखरुप घरी पोहोचला आहे. मात्र त्याच्यावर हल्ला करणाऱ्याचा शोध अद्याप सुरुच आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांनी भाष्य केलं आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यात त्यांनी आरोपींबाबत अनेक खुलासे केले आहेत. सैफ अली खान प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा करत आहेत. मुंबई पोलिसांना अद्याप फिंगरप्रिंटचा अधिकृत अहवाल मिळालेला नाही. पण आमच्याकडे आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत असं मुंबई पोलिसांनी म्हटलं. (Mumbai Police on Saif Ali Khan attack)
यापुढे पोलिस म्हणाले की, आयपी ओळख परेड अद्याप झाली नाही. ती नंतर केली जाईल. याबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट्स येत आहेत, म्हणून आम्ही गोष्टी स्पष्ट करत आहोत. आत्तापर्यंत फिंगरप्रिंट रिपोर्ट मिळालेला नाही, तो नंतर मिळेल. पण ज्याला अटक करण्यात आली आहे तोच आरोपी आहे. आम्ही योग्य आरोपी पकडला आहे. जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो तेव्हा आम्ही अनेक पुरावे गोळा करतो”.
आणखी वाचा – अर्चना पुरन सिंह यांचा सेटवर मोठा अपघात, हाताला गंभीर दुखापत, आईची अवस्था पाहून मुलांनाही कोसळलं रडू
यापुढे असं म्हटलं गेलं की, (तपास अधिकारी) हा पहिला प्रतिसादकर्ता असतो, त्यानंतर बदल होतो. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. एक चाकू आणि हेक्सा ब्लेड जप्त करण्यात आले असून, त्याचा अहवाल येणार आहे. पीडित (सैफ अली खान) रात्री २ वाजून ४५ वाजता पोहोचले. आम्हाला लीलावती हॉस्पिटलमधून माहिती मिळाली, सैफने फोन केला नव्हता. गुन्ह्य़ानंतर आरोपी कोलकाता येथे गेला होता, तेथे तो कोणाच्या संपर्कात होता, याची आम्ही चौकशी करत आहोत”.
दरम्यान, १६ जानेवारीला सकाळी सैफ अली खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर यांचा समावेश आहे. यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.