शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाप्पा आमचा आला’ गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘आठवी अ’चे कलाकार कल्ला करणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2024 | 1:19 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
itsmajja bappa aamcha aala song

‘आठवी अ’चे कलाकार घालणार धुडगूस, 'बाप्पा आमचा आला' गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीस

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी भाविक मंडळी उत्सुक असून त्यांची जोरदार तयारीही सुरु आहे. आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांबरोबरच ‘आठवी-अ’चे कलाकारही सज्ज झाले आहेत. लवकरच ‘आठवी-अ’च्या बालकलाकारांचा बालगणेश येणार असल्याचं समोर आलं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी ‘आठवी-अ’चे सर्व कलाकार वाट पाहत आहेत. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. या वेबसीरिजनंतर आता ‘बाप्पा आमचा आला’ हे नवंकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  (itsmajja bappa aamcha aala song)

‘इट्स मज्जा’ ओरिजिनल व ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आणि हीच हमी ‘इट्स मज्जा’ आगामी गणपती स्पेशल गाण्यातून पूर्ण करणार आहे. ‘इट्स मज्जा’ लवकरच प्रेक्षकांसाठी गणपती विशेष गाणं ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं घेऊन येत आहे. यंदाचा गणशोत्सव खास करण्यासाठी मीडिया वन सोल्यूशन्स व इट्स मज्जा घेऊन येत आहे ‘बाप्पा आमचा आला’ हे गणपती स्पेशल गाणं. येत्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीनंतर आता आर्या बनत आहे घरातलं खेळणं, अरबाजच्या तालावर नाचणार, म्हणाला, “अभिजीतला त्रास दे तरच…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या नव्या गाण्यात अथर्व अधाते, सृष्टी दनाने, संयोगिता चौधरी, ओम पानस्कर, आध्या क्षीरसागर, श्रेयस काटके, रुद्र इनामदार, सत्यजित होमकर, शिवानी पवार, विनीत पवार, प्राजक्ता घार्गे, ऋषिकेश डीवाय पवार, प्रतीक कुचेकर, साहिल मोरे ही ‘आठवी अ’ या वेबसीरिजमधील कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी ही कलाकार मंडळी खूप उत्साही असल्याचे ‘बाप्पा आमचा आला’ या गाण्याच्या पोस्टरमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सावधान! Bigg Boss च्या घरातील स्पर्धकांची झोप उडणार, मानकाप्याची एण्ट्रीने आलं मोठं संकट

‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं ओमकार कानिटकर व आंचल ठाकूर यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन समीर पठाण यांनी केलं आहे. तर सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम मंदार पाटील यांनी केलं आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन वाडेवाले यांनी सांभाळली असून नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘बाप्पा आमचा आला’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पाडली आहे. त्यामुळे आता ‘आठवी-अ’चे कलाकार या गाण्यात काय धमाल मजामस्ती करणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल.

Tags: bappa aamcha aala new songbappa aamcha aala new song newsitsmajja bappa aamcha aalaamarathi song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
masaba gupta baby shower

नीना गुप्ता यांच्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा शाही थाट, बॉलिवूड कलाकारांची गर्दी, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.