सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी भाविक मंडळी उत्सुक असून त्यांची जोरदार तयारीही सुरु आहे. आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांबरोबरच ‘आठवी-अ’चे कलाकारही सज्ज झाले आहेत. लवकरच ‘आठवी-अ’च्या बालकलाकारांचा बालगणेश येणार असल्याचं समोर आलं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी ‘आठवी-अ’चे सर्व कलाकार वाट पाहत आहेत. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. या वेबसीरिजनंतर आता ‘बाप्पा आमचा आला’ हे नवंकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (itsmajja bappa aamcha aala song)
‘इट्स मज्जा’ ओरिजिनल व ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आणि हीच हमी ‘इट्स मज्जा’ आगामी गणपती स्पेशल गाण्यातून पूर्ण करणार आहे. ‘इट्स मज्जा’ लवकरच प्रेक्षकांसाठी गणपती विशेष गाणं ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं घेऊन येत आहे. यंदाचा गणशोत्सव खास करण्यासाठी मीडिया वन सोल्यूशन्स व इट्स मज्जा घेऊन येत आहे ‘बाप्पा आमचा आला’ हे गणपती स्पेशल गाणं. येत्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या नव्या गाण्यात अथर्व अधाते, सृष्टी दनाने, संयोगिता चौधरी, ओम पानस्कर, आध्या क्षीरसागर, श्रेयस काटके, रुद्र इनामदार, सत्यजित होमकर, शिवानी पवार, विनीत पवार, प्राजक्ता घार्गे, ऋषिकेश डीवाय पवार, प्रतीक कुचेकर, साहिल मोरे ही ‘आठवी अ’ या वेबसीरिजमधील कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी ही कलाकार मंडळी खूप उत्साही असल्याचे ‘बाप्पा आमचा आला’ या गाण्याच्या पोस्टरमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सावधान! Bigg Boss च्या घरातील स्पर्धकांची झोप उडणार, मानकाप्याची एण्ट्रीने आलं मोठं संकट
‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं ओमकार कानिटकर व आंचल ठाकूर यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन समीर पठाण यांनी केलं आहे. तर सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम मंदार पाटील यांनी केलं आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन वाडेवाले यांनी सांभाळली असून नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘बाप्पा आमचा आला’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पाडली आहे. त्यामुळे आता ‘आठवी-अ’चे कलाकार या गाण्यात काय धमाल मजामस्ती करणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल.