सिनेसृष्टीत रितेश व जिनिलीया यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्यावरील संस्कारांचे प्रत्येकवेळी सर्वत्र कौतुक होते. रियान व राहील अशी त्यांना दोन मुलं आहेत. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे विशेष लक्ष दिलं. देशमुख कुटुंब हे बरेचदा चर्चेत असतं. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात. जिनिलीया व रितेशच्या दोन्ही मुलांना खेळाची प्रचंड आवडही आहे. अशातच जिनिलीयाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने ती चर्चेत आली आहे. (Genelia Deshmukh On IPL)
सर्वत्र देशभरात आयपीएलची क्रेझ सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आयपीएल पाहण्यासाठी चाहते मंडळी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत सगळेजण आपल्या मनोरंजनासाठी आयपीएल पाहताना दिसत आहेत. बरीचशी कलाकार मंडळीही आयपीएलला सपोर्ट करताना दिसत आहेर. तर मुंबईचे रहिवासी असलेली कलाकार मंडळी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसत आहेत. अशातच यंदाच्या आयपीएलला अनेक कलाकार मंडळींनी आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियमला हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लेकांसह आयपीएल पाहायला हजेरी लावली आहे. देशमुखांची लाडकी सून जिनिलीया देशमुख ही तिच्या दोन्ही लेकांसह मॅच पाहण्यासाठी स्टेडियमला पोहोचली. जिनिलीयाने मॅच दरम्यानचे काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये हा खेळ खेळण्यात आला. ही मॅच पाहण्यासाठी जिनिलीया वानखेडेला पोहोचलेली पाहायला मिळाली. शेअर केलेल्या फोटोंमध्ये जिनिलीया मुंबई इंडियन्सची जर्सी करुन मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली.
जिनिलीया यावेळी तिची दोन्ही मुलं रियान व राहील यांच्यासह दिसली. तिच्या लेकांनीही मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केली होती. मुंबई संघाचा झेंडे हातात घेऊन ते मॅच एन्जॉय करताना दिसले. लाईव्ह मॅच दरम्यानचे काही व्हिडीओदेखील जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.