प्रसिद्ध उद्योगपती मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी या वर्षी मार्च महिन्यात उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकला. संपूर्ण जगभरात अनंत व राधिकाच्या लग्नाची असलेले बघायला मिळाली. लग्नानंतरही राधिका व अनंत यांचे लग्नानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. लग्नानंतर राधिकाने स्वतःचे नाव बदलून राधिका मर्चंटवरुन बदलून राधिका अंबानी असे ठेवले आहे. अशातच आता लग्नानंतर पहिल्यांदाच तिने कामाबद्दल भाष्य केले आहे. तसेच तिने खूप काळानंतर काम करण्यासदेखील सुरुवात केली आहे. याबद्दल आता सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (radhika merchant-ambani career plan)
अंबानी कुटुंबाची लहान सून वाडिलांच्या एंकोर हेल्थकेअर मेडिकल रिप्रेजेंटेटीव्ह म्हणून करियरची सुरुवात केली. आता राधिका एनकोर हेल्थकेअरमध्ये डोमेस्टिक मार्केटिंग एक्ज्यूकिटीव्ह डायरेक्टर आहे. राधिका सध्या साऊथ इंडिया कंपनी विस्ताराचे काम पाहत आहे. तसेच देशभरात हेल्थ केअर उत्पादने देशभरात सहज उपलब्ध व्हावीत यासाठी तंत्रज्ञानावरही जोर देण्यात येणार आहे. नुकतीच एका मुलाखतीदरम्यान राधिकाने तिचा करियर प्लॅनबद्दल भाष्य केले आहे.
राधिका म्हणाली की, “माझ्या आधीच्या बॉसने मला सांगितलं होतं की जर तुम्ही एखाद्या कंपनीचा सेल मॅनेज करत असाल तर तिथे तुम्ही काहीही काम करु शकता. कारण सेलसाठी तुमचं उत्पादन, अर्थ व विपणन याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी तुम्ही ग्राहकाशी थेट जोडले जाऊ जाल अशा अशा पातळीवरपण तुम्ही काम करु शकता”.
गेल्या महिन्यात लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस राधिकाने साजरा केला. वाढदिवस साजरा केल्याचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अनंत व राधिका यांचा १२ जुलै रोजी मुंबई येथे शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. अनंत व राधिका यांच्या सर्व फोटो व व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली होती. पाच दिवस मुंबईमध्ये जल्लोषात लग्न पार पडल्यानंतर अंबानी कुटुंब लंडनमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली होती.