Bigg Boss 18 Vivian Dsena Troll : सलमान खानचा ‘बिग बॉस १८’ हा रिऍलिटी शो सध्या चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील ही स्पर्धक मंडळी अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस १८’ मधील विवियन डिसेना हा स्पर्धक यंदाचा पर्वात विशेष चर्चेत आला आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये, विवियन डिसेनाने ‘डार्लिंग’ म्हणण्यावर आपले मत व्यक्त केले. यादरम्यान त्याने आपली तुलना दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबरोबर केली. आता अभिनेत्याचा मत मांडतानाचा व्हिडीओ समोर आला असून दुसरीकडे लोकांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.
विवियनला ‘बिग बॉस’ यांनी डार्लिंग म्हटले आणि आता या अभिनेत्याने यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्याचं हे बोलणं लोकांना सोशल मीडियावर आवडलेलं नाही. चॅनल त्याला ‘डार्लिंग’ का म्हणतं?, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक त्याची सिद्धार्थ शुक्लाशी तुलना करत असल्याबद्दल बरेच काही बोलत आहेत. एका ट्विटर युजरने ‘बिग बॉस १८’ च्या घरात विवियन डिसेना आणि ॲलिस कौशिक यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “आम्हाला आधीचा सूरज पाहिजे…”, सूरज चव्हाणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांची नाराजी, म्हणाले, “कोणाचं ऐकून…”
या व्हिडीओमध्ये विवियन असे म्हणताना दिसत आहे की, “मला माहित आहे की हे लोक मला डार्लिंग का म्हणतात, कारण मी एकमेव अभिनेता आहे, प्रत्यक्षात दोन होतो, दुसरा गेला. वाहिनीसमोर बसून बरोबर बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारे आम्ही दोघेच होतो. याबरोबरच या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या ‘बिग बॉस १३’ मधील काही झलक पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सिद्धार्थ सलमानसमोर सिंहासारखा गर्जना करताना दिसत आहे.
आणखी वाचा – लेकाला शोमध्ये बोलावल्याचा अमिताभ बच्चन यांना पश्चाताप, अभिषेकने पोलखोल करत वडिलांनाच केलं ट्रोल
निर्भीड सिद्धार्थ या व्हिडीओमध्ये आपले मत मांडत आहे. त्याचवेळी, शोच्या आतील काही झलक देखील येथे दर्शविल्या गेल्या आहेत ज्यामध्ये सिद्धार्थ हा एकटाच दिसत आहे जो कुटुंबातील सर्व सदस्यांवर वर्चस्व गाजवतोय. आता विवियनला सिद्धार्थशी अशा प्रकारे स्वतःची तुलना करणे नेटकऱ्यांना आवडत नाही आहे. सोशल मीडिया यूजर्सनी विवियनचा गौप्यस्फोट केला आहे. “विवियन तू कधीच सिडच्या बरोबरीचा असू शकत नाहीस”, “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली”, “अनेक लोक आले आणि अनेक येतील, पण राजा एकच आहे, सिद्धार्थ शुक्ला”, नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट करत विवियनची कानउघडणी केली आहे.