प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनय व नृत्य कौशल्यातून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘जत्रा’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘खो-खो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर उत्तम नृत्यांगणा देखील असून तिने तिच्या नृत्याविष्काराची झलक अनेकदा पाहायला मिळाली आहे. शिवाय, तिने ‘काकण’ चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. क्रांती जरी अभिनयातून फारशी दिसत नसली, तरी ती या क्षेत्रात बऱ्यापैकी सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. (Kranti Redkar celebrates Diwali at her husband hometown)
मनोरंजन क्षेत्राबरोबर उद्योजिका असलेली क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटोज व व्हिडीओज चाहत्यांसह शेअर करते, ज्याची बरीच चर्चा रंगते. क्रांतीने शासकीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न केलं. दोघांना ‘झिया’ व ‘झायदा’ या जुळ्या मुली आहे. दोघांचं त्यांच्या मुलींबरोबर खूप छान बॉण्डिंग दिसून येत असून ते दोघंही त्यांच्या मुलीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून ज्याची चांगली चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – Tharal Tar Mag : अर्जुनने सायलीला दिलं दिवाळी पाडव्याचं खास गिफ्ट, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष
देशभरात नुकतंच दिवाळीचा सण पार पडला असून अनेक कलाकारांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. क्रांती सहकुटुंब तिची दिवाळी साजरी करण्यासाठी पती समीर वानखेडे यांच्या वाशिम येथील मूळगावी पोहोचली. यावेळी तिने समीर यांच्या नातेवाईकांसह मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. या क्षणाचा एक व्हिडीओ नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, क्रांतीच्या सासरकडची मंडळी समीर यांना भाऊबीजेनिमित्त औक्षण करताना दिसत आहे. तसेच, क्रांती आणि तिच्या लेकी वडिलांबरोबर फटाके फोडत असल्याचं यात पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने “इतकं प्रेम करणाऱ्या तुमच्या स्वतःच्या लोकांसह हा सण साजरा करणे खूप आनंदाची गोष्ट आहे.”, असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – तुझ्या नवीन घरात कधी बोलवणार?, सोनाली कुलकर्णीचा सई ताम्हणकरला प्रश्न, उत्तर देत म्हणाली, “तुमचं दुबई…”
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आला. ज्यात हा साधेपणा पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. एक नेटकरी यावर कमेंट करत म्हणाला, “अरे व्वा, किती छान. तू इतकी मोठी अभिनेत्री असूनसुद्धा गावी जाऊन दिवाळी साजरी करायला गेला. विशेष म्हणजे, तुम्ही मुलांना देखील घेऊन गेलात. तुम्ही असेच विनम्र राहा.”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “तुमच्या कुटुंबातील लोक खूप सुंदर आहे”, अशी कमेंट करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. क्रांतीच्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.