Bigg Boss Marathi 5 : सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील टीम बदलल्याचं दिसत आहे. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला निक्कीने ‘टीम ए’मधून काढता पाय घेतला. यानंतर निक्कीने अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या मैत्रीत दुरावा आला. यानंतर घरातील इतर सदस्य अरबाजला निक्कीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले. घरात बीबी करंन्सीसाठी पाताळ लोक टास्क पार पडला. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये बांधलं. यामध्ये निक्की-अभिजीत, आर्या-अरबाज, वैभव-धनंजय, जान्हवी-सूरज, अंकिता-वर्षा, पॅडी-घनश्याम अशा जोड्या पाहायला मिळाल्या. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
निक्की व अभिजीत यांची जोडी झाली आहे आणि त्यांची ही मैत्री काहींना खटकत आहे. निक्कीबरोबर राहून अभिजीत तिच्या म्हणण्यापप्रमाणे वागत आहे आणि तिचंच ऐकत आहे अशी समज अभिजीतच्या टीममधील अंकिता, डीपी व इतर सदस्यांची झाली आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या शुक्रवारच्या भागात अंकिताने अभिजीतवरचा तिचा अविश्वास व्यक्त केला. अभिजीत हा ‘बिग बॉस’च्या घरातील कधीही विश्वास न ठेवता येणारा व्यक्ती असल्याचे मत तिने व्यक्त केलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनी मिळविला नवीन कॅप्टन पदाचा बहुमान, ‘ते’ सदस्य ठरले किंगमेकर
‘बिग बॉस’च्या घरात अभिजीतबद्दल चर्चा सुरु असताना अंकिता त्याच्याबद्दल आर्या, अरबाज व वर्षा यांना असं म्हणते की, “माझा अभिजीतवर अजिबात विश्वास नाही. हा सीझन ससंपेपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास नसणार आणि हे फुटेज त्याला चक्रूव्यूहमध्ये दाखवलं तरी काही हरकत नाही. त्याने मला विचारलं तरी मी त्याला तोंडावर उत्तर देणार. मी एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त दोन वेळा संधी देते. त्यानंतर मी विश्वास ठेवत नाही.”
आणखी वाचा – 31 August Horoscope : कर्क, तूळ, धनु राशीच्या लोकांना शनिवारी मिळणार शुभवार्ता, बाकीच्या लोकांसाठी दिवस कसा?
‘बिग बॉस’च्या घरात ड्यूटीवरुन काहीतरी संभाषण चालू असताना अभिजीत अंकिताला विचारतो. तेव्हा ती माझ्याऐवजी कॅप्टन निक्कीला काय ते विचारावं असं त्याला सांगते. यावरून झालेल्या संभाषणात ती बाहेर येते अँऐ वर्षा, अरबाज व आर्या यांना अभिजीतवर मला विश्वास नसल्याचे सांगते. त्यामुळे आता अंकिता म्हटल्याप्रमाणे अभिजीतपर्यंत हे फुटेज बिग बॉस पोहोचवणार का? यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल? हे पाहणे रंजक ठरणार आहे.