बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा तावडेने जपली मराठमोळी परंपरा, अगदी साध्या पद्धतीच्या मंगळसूत्राला दिली पसंती, डिझाइन आहे खूपच छान, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2024 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

तितीक्षा तावडे सिद्धार्थ बोडके लग्न

कलाकारांचं मंगळसूत्र ही एक फॅशन झाली आहे. सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधात अडकताना पाहायला मिळत आहेत.या कलाकार मंडळींचे लूक, दागिने, पोशाख सर्वकाही चर्चेत ठरत आहे. अशातच अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे नुकतीच विवाहबंधनात अडकली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates)

तितीक्षा व सिद्धार्थ यांचा आज शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. दोघांनी अत्यंत साध्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा उरकला आहे. तितीक्षा व सिद्धार्थ यांचा पारंपरिक थाटामाटात लग्नसोहळा झाला असून दोघांच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. लग्नासाठी तितीक्षाने मोती रंगाची नऊवारी साडी व त्यावर कॉन्ट्रास्ट सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केला. या साडीला सोनेरी रंगाचा काठ असून त्यावर सोनेरी रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. तसेच त्याच रंगाची शालही तिने घेतली आहे. तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. या लग्नसोहळ्यातील आकर्षणाची बाब म्हणजे तितीक्षा तावडेच मंगळसूत्र.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! निसर्गाच्या सानिध्यात थाटामाटात पार पडलं तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं लग्न, जपली मराठी परंपरा

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Sharma (@aisharma812)

तितीक्षाच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचे मंगळसूत्र हे अंत्यत सुंदर व नाजूक असून त्या डिझाइनची चर्चाही पाहायला मिळत आहे. तितीक्षाच्या या पारंपरिक मंगळसूत्राने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. तितीक्षाच्या गळ्यातील सोन्याचं हे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसत आहे. तिच्या या मंगळसूत्राला देण्यात आलेला पारंपरिक टच विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या या नववधूवराच्या लूकमधील फोटोंवर चाहते व कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – नववधूसारखी तयार झाली मिताली मयेकर, मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले. लग्नापूर्वी थेट केळवणाचा फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली चाहत्यांसह शेअर केली. मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं, आणि त्यानंतर अखेर आज दोघांनी विवाहसोहळा उरकला. दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाचं एक पाऊल टाकलं आहे.

Tags: Titeeksha Tawde Siddharth BodkeTiteeksha Tawde Siddharth Bodke MarriageTiteeksha Tawde Siddharth Bodke WeddingTiteeksha Tawde Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Music Legend Pankaj Udhas Death News in Marathi

Pankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन नेमकं कशामुळे झालं?, लेकीने पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, निधनापूर्वी काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.