सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हजारो सेलिब्रिटींनाही नीता अंबानींनी टाकलं मागे, स्टेजवर नृत्य सादर करताच उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2024 | 12:56 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi,

Neeta Ambani Dance Performance

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. बॉलीवूड, हॉलिवूड ते क्रिकेट जगतातील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. अंबानीं कुटुंबियांच्या या फंक्शनमध्ये अनेक कलाकारांनी परफॉर्मन्सही दिला. मात्र नीता अंबानींनी केलेल्या डान्सने सगळ्यांवर छाप पाडली. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नीट अंबानी यांनी केलेला डान्स चर्चेत आला आहे. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding)

अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये संपूर्ण बॉलीवूड थिरकताना दिसलं. रिहाना ते अकानपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी लाइव्ह स्टेज परफॉर्मन्सही दिला. मात्र, एकट्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या सगळ्यावर पडदा टाकला, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. नीता अंबानी यांचा परफॉर्मन्स पाहून सगळेच थक्क झाले. नीता अंबानी यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच व्हायरल झाला. धाकट्या लेकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात नीता अंबानी यांनी आई अंबेला समर्पित विश्वंभरी स्तुती केली.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चक्रावले, हुबेहुब आईसारखी दिसत आहे आराध्या बच्चन, इतका झाला आहे बदल

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

या नृत्याच्या माध्यमातून नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या व सुनेच्या सुखी आयुष्यासाठी आई अंबेकडे प्रार्थना केली. याशिवाय, त्यांनी केलेलं हे नृत्य नातवंडे शक्ती, वेद व आदित्य आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या सर्व महिलांना समर्पित केलं आहे. नीता अंबानी यांच्या या नृत्याचे खूप कौतुक झालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी हा चित्रपटाचा सेट वाटत असल्याचं म्हटलं आहे तर नीता अंबानी या अभिनेत्री वाटत आहेत, असं म्हटलं आहे. अनंत व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सारा अली खान, सुहाना खान, अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, करीना कपूर व आलिया भट्टसह अनेक कलाकारांनी डान्स केला.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची बायको झाली डॉक्टर, ठाण्यात स्वतःचं क्लिनिक सुरु केल्यानंतर कलाक्षेत्रामधून कौतुकाचा वर्षाव अन्…

अनंत व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला उपस्थित असलेल्या पाहुण्यांबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खान, आमिर खान, अनिल कपूर, रणवीर सिंग, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांच्यासह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. याशिवाय क्रिकेट जगतातील महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकरही कुटुंबासह पोहोचले. मेटा चेअरमन मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स व डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Tags: Anant Ambani-Radhika MerchantAnant Ambani-Radhika Merchant Pre Weddingneeta ambanineeta ambani dance video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Yogita Chavan Saorabh Choughule took a special ukhana for each other in their wedding

“जागो जागी होई मला याचाच भास...",  'जीव माझा गुंतला' फेम योगिता-सौरभचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, मंडपातच एकमेकांना घास भरवला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.