गुजरात, जामनगर येथे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व सून राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. सलग तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यालाल देशातीलच नव्हे तर परदेशातीलही नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते. पॉप स्टार रिहानापासून ते दिलजीत दोसांझपर्यंत अनेकांनी आपल्या परफॉर्मन्सने धुमाकूळ घातला. शाहरुख खानपासून ते रणवीर सिंगपर्यंत बॉलिवूड कलाकारही थिरकताना दिसले. पण एक काळ असा होता की ‘स्वर कोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्याची करोडो रुपयांची ऑफर नाकारली होती. (Lata Mangeshkar Incident)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळयाला कुणी गाणी गायली तर कुणी गाण्यांवर डान्स केला. शाहरुखने गौरीसह रोमँटिक डान्स केला. इतकंच नव्हेतर प्रेग्नंट दीपिका पदुकोणही नवऱ्यासह थिरकताना दिसली. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर लता मंगेशकर यांनी कोट्यवधी रुपये मिळणार असतानाही त्यांनी कधीही कोणाच्या लग्नात परफॉर्म केले नाही.
लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर सीझन ५’ मध्ये हा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, “लग्नात गाण्यासाठी त्याला एक मिलियन डॉलर्सची ऑफर आली होती”. पुढे त्या म्हणाला, “फक्त दोन तास येऊन लग्नाला हजेरी लावा” असं त्यांनी म्हटलं. यावर लता दीदींनी, “तुम्ही मला पाच मिलियन डॉलर्स दिले तरी मी येणार नाही”, असं उत्तर दिलं.
ईशा अंबानी व आनंद पिरामल यांच्या लग्नासाठी, लता मंगेशकर यांनी गायत्री मंत्र व गणेश स्तुती रेकॉर्ड करुन जोडप्यासाठी खास संदेश दिला. त्यांचे रेकॉर्डिंग गुजराती व हिंदू वैदिक विधी दरम्यान वाजवले गेले.