‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेले बरेच दिवस गौतमीच्या लग्नाची लगबग सर्वत्र सुरु असलेली पाहायला मिळाली. लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरसह ती लग्नबंधनात अडकली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून गौतमीने आपल्या अभिनयातील प्रवासाची सुरुवात केली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आता अखेर तिला तिच्या खऱ्या आयुष्यातील आदित्य भेटला आहे. (Gautami Deshpande and Swanand Tendulkar)
गौतमीच्या लग्नसोहळ्याने सोशल मिडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, व कुटुंबियांच्या उपस्थितीत खडकवासला पुणे येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी त्यांचं लग्न उरकलं. अगदी शाही थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. गौतमी-स्वानंदच्या मेहंदी, हळदी समारंभाच्या फोटोंनीही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. गौतमी-स्वानंदच्या लग्नसोहळ्यात आणखी एक विशेष बाब म्हणेज लग्नासाठी त्यांनी वापरलेले हॅशटॅग.
गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या नावावरून #swag हा हॅशटॅग वापरुन फोटो शेअर केले होते. याशिवाय लगीनघाई सुरु झाल्यापासून आणखी एक हॅशटॅग त्यांच्या फोटोंबरोबर होता तो म्हणजे #lafdi . #lafdi हा हॅशटॅग नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न गौतमीच्या चाहत्यांना पडला होता. अखेर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे चाहत्यांच्या या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे. #lafdi वरुन आलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. एका चाहतीने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करत, “#lafdi चा नेमका अर्थ काय आहे?” अशी कमेंट केली. यावर उत्तर देत मृण्मयी म्हणाली, “स्वानंद तेंडुलकरला विचार. मलासुद्धा माहित नाही. पण तो सारखा बोलत असतो लफडी नकोत” असं म्हटलं आहे.

गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटीक पोज देत तिच्या मेहेंदी समारंभानिमित्त पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याचा खुलासा केला. याआधी गौतमी व स्वानंद यांच्या नात्याची चर्चा सुरु होती मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नापूर्वी त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता.