कलाकार असो वा सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकजण हा त्याच्या पुढील आयुष्यासाठी काही ना काही प्लॅन्स बनवत असतो. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने थेट पुढील ५ वर्षांचा प्लॅन बनवला आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. अभिनय, गायन, कविता, सूत्रसंचालन यांसारख्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नाटक, मालिका, चित्रपट या क्षेत्रातून तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये सोडत आपली स्वतःची अशी जागा निर्माण केली. इतकंच नव्हे तर या मराठमोळ्या अभिनेत्रीने हिंदी प्रेक्षकांनाही आपली भुरळ घातली. (Spruha Joshi Shared Plans)
अभिनेत्रीने पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स ठरवले असून तिने चाहत्यांबरोबर तिचे हे प्लॅन्स शेअर केले आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे हटके फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच स्पृहाने एक ट्रेंडिग व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामधून पुढील पाच वर्षांचे तिचे प्लॅन्स काय असणार आहेत? हे तिने सांगितलं आहे.
स्पृहाने हा व्हिडीओ शेअर करत असं लिहिलं आहे की, “पुढील पाच वर्षांसाठी माझे प्लॅन्स…” असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती असं म्हणतेय की, “जेव्हा कोणी मला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सबद्दल विचारतं. तेव्हा मी सांगते, मी आणखी दिसायला हॉट होईन. आणखी विचित्रपणा करेन. आणखी श्रीमंत होईन. आणखी भयानक होईन. आणखी अनपेक्षित होईन” असं म्हटलं आहे.
स्पृहाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे. स्पृहा सध्या मालिकाविश्वपासून दूर असून नाटकविश्वात रमली आहे. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. प्रेक्षकही या कार्यक्रमाला जोरदार प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत.