बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या, इम्रान खान पत्नी अवंतिकापासून विभक्त, लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दलही केला खुलासा, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Imran khan confirm his divorce from avantika malik reveals also he said I am in relationship with lekha washington see the details

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या, इम्रान खान पत्नी अवंतिकापासून विभक्त, लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दलही केला खुलासा, म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो फारसा कुठल्या चित्रपटात दिसला नाही. पण मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीबरोबरच्या बिघडलेल्या नातेसंबंधांमुळे चांगलाच चर्चेत आहेत. इम्रान खानने २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केलं होतं. मात्र, २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या अनेक चर्चा रंगताना दिसल्या आणि अखेर चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत.

इम्रान खानने स्वतः याबद्दलचा खुलासा केला आहे. इम्रान खानने त्याचे लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दल सांगितले असून २०१९ मध्ये त्याची माजी पत्नी अवंतिका मलिक हिच्याशी घटस्फोट झाल्याचेही अभिनेत्याने उघड केले. वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले. यावेळी इम्रानने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या त्याच्या नात्याला दुजोरा दिला. त्याने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या अनेक अफवा खऱ्या असल्याचेही मान्य केले. तसेच २०१९ मध्येच त्याने अवंतिकापासून घटस्फोटाचा घेतला असल्याचाही खुलासा केला.

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

आणखी वाचा – ‘बालक पालक’ व ‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद सध्या काय करते?, अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीपासून लांब का आहे?, जाणून घ्या…

अवंतिकापासून घटस्फोट घेतल्याच्या १ वर्षांनंतर तसेच लेखाही तिच्या जोडीदाराबरोबर विभक्त झाल्याच्या काही दिवसांनी आम्ही दोघे लॉकडाऊनदरम्यान एकत्र आल्याचे सांगितले. यादरम्यान, त्याच्याबद्दल आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केल्या जाणाऱ्या अनेक चर्चांवर इम्रानने निराशा व्यक्त केली. तसेच त्याच्या कुरूप स्वभावाबद्दल व एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या स्वायत्ततेबद्दल त्याने रागही व्यक्त केला.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या

दरम्यान, इम्रान नुकताच आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नात सहभागी झाला होता. तसेच याआधी त्याने अवंतिकाबरोबरच्या नात्याबद्दल कुठेही सांगितले नव्हते. अशातच त्याने पाहिल्यांदाच अवंतिकाबरोबरच्या घटस्फोटाबद्दल व लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या रिलेशनबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

Tags: Avantika Malikbollywood actorbollywood actressbollywood newsentertainment newsImman Khan Divorce Newsimran khanlekha washingtonअवंतिका मलिकइमान खान घटस्फोट बातमीइम्रान खानबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीलेखा वॉशिंग्टन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Jacqueline Fernandez Mumbai building catches fire video viral on social media no casualties reported

जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलं होतं अलिशान घर, अभिनेत्रीच्या घराचं नुकसान?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.