TMKOC Fame Munmun Dutta Talk On Motherhood : हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुनमुन दत्ता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून बबिता या भूमिकेत ती गेली तब्बल १८ वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही मुनमुन नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मुनमुन तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही मोकळेपणाने बोलताना दिसते. नुकतीच तिने रणवीर अल्हाबादिया याला दिलेल्या मुलाखतीत तिने करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि आयुष्याविषयीच्या तिच्या ठाम मतांवर भाष्य केलं आहे.
या मुलाखतीत तिने परदेश प्रवासाचे अनुभव, मालिकेतील काही आठवणी तसेच तिला जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत याबद्दलही खुलासा केला. मुलाखतीदरम्यान तिच्या ग्लोईंग त्वचेचं गुपित विचारलं असता, मुनमुन हसत म्हणाली, “मी अजून लग्न केलेलं नाही, मला मुलं नाहीत आणि त्यामुळे कोणताही ताण नाही. कदाचित त्यामुळेच माझी त्वचा चांगली दिसत असावी.” तिचं हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.यानंतर आई होण्याबाबत विचारण्यात आल्यानंतर मुनमुननं अत्यंत स्पष्ट शब्दांत तिची भूमिका मांडली. ती म्हणाली, “मला आई व्हायचं नाही. या निर्णयाबाबत मी पूर्णपणे ठाम आहे. लोक काय म्हणतील?, याची मला चिंता नाही. हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो आणि हे माझं मत आहे.”
आणखी वाचा – अभि-कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर लॉँच; अभि-कृतिकाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खुश
त्याच मुलाखतीत मुनमुनने भविष्यातील जोडीदाराबाबतही अपेक्षा सांगितल्या. तिच्या मते, जोडीदार असा हवा जो तिच्याशी बरोबरी करणारा, समजून घेणारा आणि पाठिंबा देणारा असेल. “समोरच्या व्यक्तीमुळे माझा त्याच्याबद्दलचा आदर वाढला पाहिजे,” असंही ती म्हणाली. याशिवाय, तिने भारतीय पुरुषांपेक्षा परदेशातील पुरुष अधिक आवडतात असं मत व्यक्त केलं. यावेळी तिनं तिच्या आवडत्या हॉलीवूड आणि कोरियन अभिनेत्यांची नावंही सांगितली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुनमुन दत्तानं व्यक्त केलेली ही मतं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून अनेकजण तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा – “मला १२ वाजता का बोलवलं?” O’Romeo च्या ट्रेलर लॉँचमध्ये रागातून उठून गेले नाना पाटेकर; नेमकं काय घडलं?





