सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तन्वीच्या हातात कॅप्टन्सीची चावी, रोशन-आयुषवर टांगती तलवार, कोण होणार घराचा नवा अधिकारी?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2026 | 8:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 6 

तन्वीच्या हातात कॅप्टन्सीची चावी, रोशन-आयुषवर टांगती तलवार, कोण होणार घराचा नवा अधिकारी?

Bigg Boss Marathi 6  : ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या कॅप्टन्सीसाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’च्या घराचा पहिला कॅप्टन पदाचा मानकरी गायिका प्राजक्ता शुक्रे ही ठरली. पण आठवडा संपल्यानंतर आता पुढील आठवड्याचा अधिकारी कोण होणार यासाठी स्पर्धकांमध्ये लढाई सुरु झाली आहे. घरात आता दोन टीम पडू लागल्या आहेत. त्यामुळे पुढचा कॅप्टन कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने आता नव्या कॅप्टन्सीसाठी एक टास्क स्पर्धकांना दिला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमीच वाद, भांडण होताना दिसतात मात्र आता कॅप्टन्सीसाठी या स्पर्धकांना एकमेकांना मस्का लावावा लागणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, कॅप्टन्सीसाठी स्पर्धक एकमेकांना मस्का लावणार आहेत. कॅप्टन्सीसाठी लावला जातोय मस्काभारी, कोण होणार घराचा नवा अधिकारी असा नवा टास्क आता स्पर्धकांना देण्यात आला आहे. प्रत्येकी दोन जणांची मत बाद करायची अशी सूचना स्पर्धकांना देण्यात येते. यावर सगळे स्पर्धक आपापले मत मांडतात. शेवटी तन्वीचा टर्न असतो. त्यावेळी ‘बिग बॉस’ असं घोषित करतात की, तन्वी यांचं वोट ठरेल निर्णायक. आयुष आणि रोशन यांमध्ये तिला एका स्पर्धकाची निवड करायची असते.

आणखी वाचा – “मला आई व्हायचं नाही…” TMKOC फेम बबिताचं वक्तव्य, मातृत्वाबद्दल म्हणाली, “मी अजून लग्न केलेलं नाही…”

आता तन्वीच्या हातात घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे असतं. दरम्यान आयुष संजीव आणि रोशन भजनकर यांमध्ये ही लढाई सुरु असते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तन्वीच्या वोटवर असतात. तन्वीने ‘बिग बॉस’च्या घरात डे १ पासून राडा घातलेला आहे, त्यामुळे तिचं बऱ्याच स्पर्धकांशी वाकड आहे. आणि म्हणूनच तन्वी आता कोणत्या स्पर्धकाला वोट करणार आणि ‘बिग बॉस’च्या घराचा नवा अधिकारी निवडणार हे पाहणं रंजक ठरेल.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Tags: Bigg Boss Marathi 6bigg boss new promoentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
kamal roy death reason

साऊथ सुपरस्टारचे निधन; वयाच्या ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.