छोड्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यातल्या काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात मालिका संपल्या तरीही मनात राहतात. अशीच एक जोडी जिने छोड पडदा गाजवला मानस आणि वैदेही म्हणजे फुलपाखरू मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळे, अभिनेता यशोमान आपटे.(hruta durgule)
या मालिकेनंतर अभिनेत्री ऋता ने मन उडू उडू मालिकेतील उत्तम कामगिरीने प्रेक्षकांच्या मानत असलेलं स्थान कायम ठेवलं. या मालिकांमधून घराघरात पोहोचत ऋताने एक मोठा प्रेक्षकवर्ग कमावला. इन्स्टाग्रामवरही सर्वाधिक फॉलोइंग असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हृताचा समावेश होतो.

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत तिने दीपिका देशपांडे ही भूमिका साकारली होती. यातील अभिनेता अजिंक्य राऊतसोबतची तिची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना विशेष आवडली. इंद्रादीपूच्या लव्हस्टोरीचे चाहते आजही आहेत.तसेच तिच्या टाईमपास ३, अनन्या या चित्रपटातील भूमिकांना देखील चाहत्यांची पसंती मिळाली.
काय आहे गुड न्युज?(hruta durgule)
हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहीती देत असते. नुकतंच हृताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. यात ती क्युट स्माईल देताना दिसते.पण तिच्या या फोटोपेक्षा तिच्या या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधलं. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आजचा दिवस फारच खास आहे”.
या सोबतच #announcementsoon #happy #grateful #blessed #hrutadurgule, असे हॅशटॅगही दिलेले दिसून येतात. तिचे हे हॅशटॅग पाहून ती काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे बोललं जात आहे. ऋताची ही घोषणा नेमकी कशाबद्दल आहे, याबद्दल आता चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

तर अनेक जण यावर काही प्रतिकिया देत आहेत, पण काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात पण नेमकं काय आहे हे आद्यपही अस्पष्ट आहे. तर तिचा कोणता नवीन प्रोजेक्ट्ची ही घोषणा आहे का?, की ही घोषणा तिच्या वयक्तिक आयुष्याशी निगडित आहे. हे जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक झालेत.
या दरम्यान ऋता दुर्गुळेने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले. तसेच तिचा ‘कन्नी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांनां अनुभवता येणार आहे.
====
हे देखील वाचा- ‘तुला झालेल्या त्रासाबद्दल मी तुझी माफी मागतो’ श्रेयस तळपदेने मागितली क्रिती सेनॉनची माफी
====