“आई कुठे काय करते” ही मालिका महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे. विशेष करून महिला वर्गाला हा कार्यक्रम बघायला फार आवडतो. गृहिणी असुदे की बाहेर काम करणारी स्त्री जिला जसा वेळ मिळेल, तशी ही मालिका बघितली जाते. या मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाचा विषय सुरु असून अनिरुद्ध तिच्या लग्नामध्ये आडकाठी आणताना दिसत आहे. अरुंधतीच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात अनिरुद्ध काही ना काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे.(aai kuthe kay karte)

आई कुठे काय करतेमधील आईचं पुन्हा एकदा तिच्या नंदासाठी लग्न घालून देण्याचा घाट घरातील सदस्यांनी घातला आहे. हळद, केळवण, मेहंदी या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेत. ही लग्न सराई पुन्हा मांडण्यात आली आहे. अरुंधती आणि आशुतोष एकत्र येणार या बातमी ने घरातील सर्वजण खुश दिसत आहेत. तर अनिरुद्ध आणि आईचा या लग्नाला कडाडून विरोध करताना दिसत आहेत.
मालिकेत पुढे पाहायला मिळणार (aai kuthe kay karte)
आई कुठे करते मालिकेच्या आजच्या भागात अरुंधतीच्या मेहंदीतअनिरुद्ध आणि अभिषेक मध्ये भांडण होताना दिसत आहे. तर घडतं असं घरात अरुंधतीच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरु असतो. सगळे जण धमाल करत असतात. अनिश गाणी लावतो सगळे डान्स करतात तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि यश त्याला नेमक काय झालं का चिडताय अस विचारतो. हे घर आहे की डान्स क्लब, अस अनिरुद्ध बोलतो. तुम्हाला माहित होत ना की आज मेहंदी आहे, बाहेर जायचं ना अस यश उलट उत्तर देतो, मी का जाऊ बाहेर हे माझ घर अस अनिरुद्ध बोलताच इकडेच कार्यक्रम करणार बघू कोण काय करताय अस यश पुन्हा प्रतीउत्तर देतो. आप्पा देखील अनिरुद्धला बोलतात.
====
हे देखील वाचा – अमृता खानविलकर,ओंकार भोजने, जस्ट नील आणि अनेक नामवंतांचा नवीन प्रोजेक्ट
====
इकडे मला धिंगाणा नको तेव्हा अनिरुद्ध अनिशवर चिडतो. त्याच्यावर का चिडता, तुम्हाला आमचा आणि आईचा आनंद बघवत नाही आम्ही काय करू ,जर आईशी आधी नीट वागला असता तर आज हा दिवस बघावा नसता लागला अस यश बोलताच अनिरुद्ध यशवर हात उचलतो. तेव्हा अरुंधती रोखते माझ्या मुलांची चूक नसताना त्यांना बोलायचं नाही अस बोलते. तुमचं घर आमच्या आधारावर चालतं म्हणून तुम्ही मला जाऊ देत नाही. असं अरुंधती म्हणते. तू जा पण आमच्यात फूट पाडू नको अस अनिरुद्ध बोलतो.अनिरुद्ध निघून जातो पण अरुंधतीच्या हाताची मेहंदी पुसली जाते.(aai kuthe kay karte)

तर दुसरीकडे अनिषला इशा समजावते तेव्हा अनिष ईशाला प्रेमाची कबुली देतो. तर आता इशा आणि अनिषची जोडी देखील मालिकेत पुढे पाहायला मिळणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.