“धर्मवीर” या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपटात, त्यांची उजवी बाजू म्हणून काम सांभाळणारे नेते, ‘एकनाथ शिंदे’ यांची भूमिका मराठी अभिनेता क्षितीश दाते याने पडद्यावर हुबेहूब साकारली होती. या आधी क्षितीशने अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु धर्मवीर मधील या भूमिकेमुळे क्षितीशला एक वेगळी ओळख मिळाली. क्षितीश आता “लोकमान्य” या मालिकेत टिळकांची भूमिका साकारत आहे. क्षितीशने या मालिकेतील एक बीटीएस व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Kshitish Date)

या व्हिडिओमध्ये क्षितीशचा मेकअप आर्टिस्ट लोकमान्य यांच्या भूमिकेत असलेल्या क्षितीशची मिशी नीट सेट करत आहे. या व्हिडिओवर क्षितीशने “between the scenes on the sets of लोकमान्य ” असे लिहिलंय. क्षितीशच्या या व्हीडिओवर “एकच छावा आपला सिद्धू भावा ” अशी एका चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे. तसेच अभिनेता आशुतोष गोखले याने देखील “‘Mr.Dates in his element” अशी कमेंट केली आहे.
हे देखील वाचा: अशोक मामा-लक्ष्मीकांत बेर्डेनंतर कुशल बद्रिके-भाऊ कदम…
क्षितीशने पुण्यात त्याचे शिक्षण पूर्ण केलं. क्षितीशच मास्टर सुद्धा झालं आहे. तसेच अकरावीला असताना क्षितीशने “एक्झाम्स” नावाच्या नाटकात काम केलं आहे. हे त्याचे पहिलेच नाटक होते. क्षितीशने एकनाथ शिंदे यांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली कि क्षितीशला लोक एकनाथ शिंदेंचा दुसरा पार्ट म्हणून ओळखू लागले. (Kshitish Date)
आता क्षितीश लोकमान्य टिळकांची भूमिका साकारत असून ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी टिळकांच्या पत्नींची भूमिका साकारत आहे.