कलाकार जसजसा मोठा होत जातो तसे प्रसारवाहिन्या म्हणा, वा आताच्या घडीला डिजिटल मीडिया हा त्यांना मोठ करतो किंवा कलाकारांना मोठं करण्यात त्यांचा खारीचा वाटा असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कलाकार म्हटलं की त्याला मीडियाच्या प्रश्नांना एक ना एक दिवस उत्तरं द्यावीच लागतात. यांतून कोणताच कलाकार चुकलेला नाहीय. पत्रकारांना हजारजबाबीपणाने उत्तर देण्यात एका कलाकाराचा हात कोणीही धरू शकत नव्हतं तो अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आज आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या आपल्यात नसला तरी वेळोवेळी त्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.(Laxmikant Berde Mahesh Kothare)
‘अफलातून’, ‘धडाकेबाज’, ‘बनवाबनवी’, ‘धुमधडाका’ या चित्रपटातून महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनात घर केल. त्यादरम्यान तर ही जोडगोळी बरीच चर्चेत राहिली. लक्ष्मीकांतने महेश कोठारे दिग्दर्शित बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलं. तसेच त्यांनी अभिनयही एकत्र केला. दरम्यान त्यांच्यातील मैत्री इतकी घट्ट झाली की महेश कोठारे यांच्यावर लक्ष्याने वेळोवेळी विश्वास दाखवून हे सिद्ध केलं आहे.
पहा काय म्हणाले होते लक्ष्मीकांत बेर्डे पत्रकारांना (Laxmikant Berde Mahesh Kothare)
याबाबतचे अनेक किस्से डॅम इट आणि बरंच काही पुस्तकात महेश कोठारे यांनी मांडले आहेत. त्यातील एक किस्सा म्हणजे धडाकेबाजच्या प्रेस शो नंतर मुंबईतील रिट्झ हॉटेलमध्ये एक प्रेस पार्टी आयोजित केली होती त्यादरम्यान एका ज्येष्ठ पत्रकार आणि लक्ष्मीकांत यांच्यात झालेलं संभाषण खूप महत्वाचं होत.
हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’
महेश कोठारे-लक्ष्मीकांत बेर्डे हे ‘कॉम्बिनेशन’ सर्वाधिक यशस्वी ठरलं. महेश कोठारेंनी या पुस्कात लिहिलंय, ‘थरथराट’च्या यशानंतर लक्ष्याबरोबर माझी आणखी जवळची मैत्री झाली. ‘थरथराट’मध्ये मी लक्ष्मीकांतला ज्या पद्धतीन सादर केलं होतं, ते त्याला स्वतःलाच खूप आवडलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर तो मराठी चित्रपटसृष्टीतला ‘सुपरस्टार’च झाला होता. म्हणूनच ‘धडाकेबाज’च्या वेळी त्यानं कोऱ्या करारपत्रावर सही करण्याएवढा विश्वास माझ्यावर दाखवला.(Laxmikant Berde Mahesh Kothare)
‘धडाकेबाज’च्या प्रेस शो’नंतर लगेचच आम्ही मुंबईतील रिट्झ हॉटेलमध्ये एक ‘प्रेस पार्टी’ ठेवली होती. तेव्हा एक ज्येष्ठ पत्रकार आणि लक्ष्मीकांतमध्ये झालेलं संभाषण खूप महत्त्वाचं होतं. “काय लक्ष्मीकांत, महेश कोठारेबरोबर तुम्ही काहीतरी वेगळंच करता बाबा!”“खरं आहे तुमचं म्हणणं!” “मग बाकीच्यांचे सिनेमे का करता ?””त्यांच्या सिनेमांवर माझं घर चालतं आणि महेशच्या सिनेमांमुळे माझं नाव होतं!” लक्ष्याच्या या हजरजबाबी उत्तरानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये मोठा हशा उसळला होता.
हे देखील वाचा – लक्ष्याच्या गाडीवर हल्ला, चावी घोळक्याला देत लक्षा….
त्यानंतर आणखी एका पत्रकाराकडून आलेला गुगली बॉल लक्ष्यानं असाच मैदानाबाहेर टोलवला होता. “महेश कोठारेंच्या चित्रपटांत तुम्ही षटकारांवर षटकार मारता ! ते कसं काय?” “कॅप्टन आहे ना तो आमचा! गावस्करबरोबर कपिलदेव चांगलाच खेळणार!” लक्ष्याची पत्रकार परिषदेमधील सगळी उत्तरं अगदी भारी असत.(Laxmikant Berde Mahesh Kothare)
लक्ष्मीकांत आणि महेश कोठारे यांच्या जोडीला नेहमीच लोकप्रियता मिळालीय आणि मिळतेय यांत वादच नाही.