यावर्षी हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा २३ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान रामाचे भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. हनुमानाला शिव शंकराचा रुद्रावतार मानले जाते. तसेच आजच्या कलियुगात हनुमान आजही आपल्यात आहेत अशी आख्यायिका आहे. तसकह हनुमानाला संकट मोचकही म्हंटले जाते. हनुमान जन्मोत्सव कार्तिक महिन्यात साजरी केली जाते पण चैत्र महिन्यात या दिवशी हनुमान भक्त सुंदरकांड पाठ करतात. तसेच या दिवशी हनुमान चालीसाचा पाठ तसेच भंडाऱ्याचेही आयोजन करतात. (Hanuman jayanti 2024)
या वर्षी हनुमान जन्मोत्सव मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी साजरी होणार आहे.हनुमान जयंती जेव्हा मंगळवारी किंवा गुरुवारी येते तेव्हा या जयंतीचे महत्त्व अधिक वाढते. या दोन्ही दिवशी बजरंगबली यांची अधिक कृपा असते असे म्हंटले जाते. हनुमान जन्मोत्सवासाठी बजरंगबलीला आकर्षक शृंगार, सुंदरकांड पाठ, भजन, व्रत, दान, पाठ, किर्तनं केली जातात. हनुमान जन्मोत्सव उत्तर भारत व दक्षिण भारतात दोन तिथीप्रमाणे साजरा करतात. या नुसार हनुमान जयंतीचे मुहूर्त जाणून घेऊया.

पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथीची सुरुवात २३ एप्रिल २०२४ च्या सकाळी ३ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. तसेच समाप्ती २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी होणार आहे. तसेच हनुमान पूजेचा मुहूर्त सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते १ वाजून ५८ मिनिटांचा आहे. तसेच पूजेची वेळ रात्री ८ वाजून १४ मिनिटे ते रात्री ९ वाजून ३५ मिनिटांचा आहे.
नक्षत्राप्रमाणे हनुमान जयंती चैत्र नक्षत्र रात्री १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर लगेचच स्वाती नक्षत्र सुरु होणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र कन्या राशीमध्ये व सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
हनुमान जन्मोत्सवाचे पूजा विधी कसे करावे हे जाणून घेऊया.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापूर्वी स्नान करावे. बजरंगबलीच्या समोर जाऊन व्रत संकल्प करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करावी. तसेच या दिवशी बजरंगबलीला शेंदूर व चमेलीचे तेल एकत्र करुन त्यावर चढवावे. तसेच तेलाचा दिवा लाऊन गुलाबाची माळ घालावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावे. यामध्ये तुम्ही बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून ठेऊ शकता. तसेच सात वेळा हनुमान चालीला पठन करा. रामायणाचा पाठ करणेही चांगले मानले जाते.
जाणून घेऊया भगवान हनुमानाच्या जन्माबद्दल. शास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार शृंगी ऋषि यांच्या यज्ञामध्ये पूर्णाहुती दिल्यानंतर अग्निदेवांच्या हातून मिळालेली खीर राजा दशरथांनी त्यांच्या तीन राण्यांना दिली. यावेळी तिथे असलेल्या घारीने प्रसादाच्या खिरीची वाटी घेऊन उडून गेली. यातील काही खीर किष्किंधा पर्वतावर भगवान शंकराची उपासना करणाऱ्या अंजनी मातेच्या पदरात पडली. माता अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला. देवाचे फळ म्हणून माता अंजनीच्या पोटी भगवान हनुमानाचा जन्म झाला.
हनुमान जयंतीचे उपाय
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला केवड्याचे अत्तर गुलाबाच्या फुलात टाकून अर्पण करा. त्यामुळे हनुमान लगेच प्रसन्न होतील. तसेच नोकरीमध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होतील.
जर तुम्हाला दीर्घ काळापासून काही आजार असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपामध्ये शेंदूर मिसळून हनुमानाला लेप लावावा. त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते.
हनुमान जयंतीच्या दिवशी घरावर लाल रंगाचा झेंडा फडकवावा. यामुळे संकटे येत नाहीत.