Sunita Williams : बुधवार (१९ मार्च २०२५) हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा दिवस होता. अंतराळवीर सुनीता विल्यम्स सहकर्मचारी बुच विल्मोर यांच्यासह पुन्हा पृथ्वीवर सुखरुप पोहोचल्या. त्या पृथ्वीवर परतल्यानंतर जगभरात एकच जल्लोष करण्यात आला. फक्त आठ दिवसांच्या कालावधीसाठी त्या गेल्या होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधील लागला. हा संपूर्ण काळ सुनीता यांच्यासाठी महत्त्वाचा आणि कठीण होता. अंतराळात असताना अंतराळवीर कसं जीवन जगतात? हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतः सुनीता यांनीही अंतराळातील त्यांच्या लाइफस्टाइलबाबत काही व्हिडीओ शेअर केले होते. तेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (how astronauts use toilets in space)
अंतराळात मूत्रविर्सजन तसेच टॉयलेटचा वापर कसा करतात?
फक्त आठ दिवसांच्या मिशनवर सुनीता गेल्या होत्या. मात्र हा संपूर्ण काळ नऊ महिन्यांचा झाल्यानंतर त्यांनी दिवस कसे काढले असतील? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहिले. याआधी प्रदर्शित करण्याता आलेल्या लेखात ITSMAJJA ने ते अंतराळात काय खात होते?, त्यांना अन्न कसं पुरलं? याबाबत सविस्तर माहिती दिली होती. आता नेहमीच्या जीवनातील त्यांच्या सवयीबाबत आपण माहिती घेणार आहोत.
अंतराळयानात अंतराळवीरांसाठी खास टॉयलेटची रचना करण्यात आली आहे. ज्यामध्ये व्हॅक्युमचा वापर केला जातो. टॉयलेटमध्ये व्हॅक्युम वापरल्यानंतर शरीरामधून निघालेली घाण त्या प्रेशरमुळे तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये जाते. टॉयलेटमध्ये व्हॅक्युम वापरण्याचीही एक वेगळी पद्धत अंतराळवीर वापरतात. शिवाय मूत्रविर्सजन करण्याचीही त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यासाठी अंतराळवीर वेगळ्या पाइपचा वापर करतात. हादेखील एक व्हॅक्युम पाइप असतो. मूत्रविर्सजन व मलविर्सजनासाठी वेगवेगळी जागा अंतराळयानात तयार करण्यात आली आहे.
अंतराळात मासिका पाळी आल्यास महिला अंतराळवीर काय करतात?
अंतराळात महिला अंतराळवीर मासिका पाळीचा कसा सामना करतात? याबाबत काही तज्ज्ञ व डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. डॉक्टरांच्या मते, अंतराळातील वातावरणाचा व बदलत्या ऋतूचक्राचा महिलांच्या शरीरावर थोडाफार प्रमाणात फरक पडतोच. पण याचा परिणाम त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रावर होत नाही. त्यांना ठराविक तारखेलाच मासिक पाळी येते. पण बऱ्याचदा अंतराळवीर महिला अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या घेतात. पण काहींना जर मासिक पाळी टाळायची नसेल तर महिला पॅड किंवा अधिकाधिक Tamponचा वापर करतात. Tamponचा वापर केल्यास ते बराच काळ टिकते आणि त्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने करता येते.