Aluminium foil paper : घरी बनवलेली चपाती, पुरी असो वा पराठा प्रत्येकाला अगदी फ्रेश खायला आवडतो. पण कित्येकांना कामा अभावी हे पदार्थ अगदी फ्रेश खाता येत नाहीत. अशावेळी घरात स्वयंपाक करणारी महिला असे पदार्थ फॉइल पेपरमध्ये गुंडाळते. जसजसा काळ बदलत गेला तसतसं फॉइल पेपर वापरण्याचं प्रमाण वाढत गेलं. इतकंच काय तर कित्येक हॉटेलमध्ये रोटी, पराठी, चपाती किंबहुना भाकरीही फॉइल पेपरमध्ये गुंडाळतात. पण तुम्हाला माहित आहे का, ॲल्युमिनियम फॉइल पेपर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं बोललं जात आहे. फॉइल पेपर वापरल्यामुळे आरोग्यावर नक्की काय परिणाम होतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
फॉइल पेपर बहुतेक घरांमध्ये तसेच हॉटेलमध्ये वापरला जातो. कित्येकजण तर ऑफिसमध्येही फॉइल पेपरमध्ये पदार्थ गुंडाळून घेऊन जातात. हा चमकदार कागद आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. त्याचा चुकीचा वापर करणे घातक ठरु शकते. अनेकदा लोक मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी फॉइल पेपरसह ठेवतात. परंतु हे धोकादायक असू शकते. असे केल्याने केवळ अन्न दूषित होणार नाही तर फॉइल पेपरमुळे मायक्रोवेव्हमध्ये ठिणगी पडू शकते. यामुळे उपकरणांचे नुकसान होते. स्पार्क झाल्यामुळे आग लागण्याची शक्यताही निर्माण होते.
आणखी वाचा – Video : मेकअप रुम, आकर्षक इंटेरियर अन्…; इतका मोठा व आलिशान आहे ‘चल भावा सिटीत’चा महल, व्हिडीओ समोर
फॉइल पेपर वापरण्याचे दुष्परिणाम नक्की काय?
फॉइल पेपर एकदा वापरला की तोच पेपर पुन्हा वापरणं धोकादायक ठरु शकतं. वापरलेल्या फॉइल पेपरमध्ये जंतू असू शकतात. जे ताजे अन्न खराब करू शकतात. फॉइल पेपर कधीही गॅस स्टोव्ह किंवा आगीजवळ ठेवू नये. आग लवकर पेट घेण्याची यामुळे शक्यता असते. पेट घेतल्यास मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते. फॉइल पेपरमध्ये पॅक केलेले अन्न खाल्ल्याने तुम्ही अल्झायमरच्या आजाराला बळी पडू शकता. अल्झायमर रोगात व्यक्तीला गोष्टी विसरायला लागते.
आणखी वाचा – नागपूर हिंसाचाराचा संबंध विकी कौशलच्या ‘छावा’शी जोडल्याने प्रेक्षक भडकले, म्हणाले, “आमचा हिरो…”
ॲल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये पॅक केलेले अन्न खाल्ल्याने यकृतालाही हानी पोहोचू शकते. कारण जेव्हा गरम अन्न पॅक केले जाते तेव्हा या कागदाचे घटक अन्नात मिसळतात. हे घटक अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. खूप कमी लोकांना माहित असेल की, ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेले अन्न खाल्ल्याने त्यातील घटक शरीरात जमा होतात. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय, याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो.